शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

आदेशाचे अधिकार केवळ आपत्ती प्राधिकरणालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:31 IST

नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले : इतर विभागाचे आदेश केले रद्द

नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. दि. ५ एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांनी लग्न सोहळ्यासाठी मंगल कार्यालयांना दिलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते. बैठकीस मनपा आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधक्षिक सचिव पाटील, पोलीस उपायुक्त संजय बारकुंडे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी राज्य शासनाने ह्यब्रेक द चैनह्ण अंतर्गत दिलेले आदेश तसेच मुख्य सचिवांनी दुरदृश्टप्रणालीच्या माध्यमातून दिलेल्या सुचनांच्या आधारे बैठकीत अधिकाºयांना निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी इतर विभागाने कार्यवाही करणे अपेक्षित असल्याची आठवण अधिकाºयांना करून दिली.बैठकीत जिल्हाधिकाºयांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाराची उजळणी अधिकाºयांसमोर केली. आपत्ती विषयक सर्व निर्णय घेणे व आदेश पारित करण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही जिल्ह्यातील सर्वोच्च संस्था आहे. प्राधिकरणाने घेतलेले निर्णय सर्व विभागांवर बंधनकारक असून सर्व विभागांनी आपत्ती संदभार्तील कार्यवाही करीत असताना या प्राधिकरणाने दिलेल्या निदेर्शांचे पूर्णत:अनुपालन करणे या कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन संदभार्तील यापुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील व स्वतंत्रपणे कोणताही विभाग आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पूर्वपरवानगीशिवाय आपत्ती व्यवस्थापना संदभार्तील कोणतेही आदेश काढणार नाही असाही निर्णय सर्वानुमते घेतला.दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वगळता अन्य विभागांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी यापूर्वी पारित केलेले आदेश रद्द करून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन यथोचित आदेश निर्गमित करण्याचे स्वातंत्र्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असल्याचे जिल्हाधिकाºयांनी कळविले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्या