शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

फुले महामंडळाच्या स्थितीकडे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2015 21:45 IST

भीमशक्ती संघटना : आर्थिक मदतीची मागणी

नाशिकरोड : मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची ढासळलेली आर्थिक स्थिती व प्रशासनाकडून लाभार्थ्यांची होणारी अडवणूक दूर करण्यासाठी लक्ष घालावे, या मागणीचे निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना देण्यात आले. भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बडोले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ प्रशासन व बॅँकांकडून सुशिक्षित बेरोजगारांची विनाकारण अडवणूक केली जात आहे. त्यामुळे मागासवर्गीय बेरोजगारांचा आर्थिक विकास खुंटला आहे. गेल्या सात वर्षांपासून निधी उपलब्ध न झाल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित आहे. महामंडळातील त्रुटीचे उच्चाटन करून वेळीच उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात महामंडळाला टाळे लागण्याची शक्यता आहे. लाभार्थ्यांना अपेक्षित कर्जापेक्षा अत्यंत कमी रकमेचे कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याला कुठलाही फायदा होत नाही. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर्ज प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्याची बॅँक प्रशासनाकडून विविध कारणास्तव अडवणूक केली जाते. महामंडळाच्या नाशिक कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कर्ज प्रकरणे, प्रस्ताव पुढे सरकत नाही. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महामंडळाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश पवार, सिद्धार्थ लोखंडे, राजू पवार, तुषार उन्हवणे, भाऊराव वानखेडे, मनोज उन्हवणे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)