शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सुनावणीकडे मद्यविक्रेत्यांचे लक्ष

By admin | Updated: July 5, 2017 01:12 IST

नाशिक : मद्यविक्रीवर बंदी घालण्याबाबत न्यायालयाने निर्वाळा दिल्यामुळे दुकानांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतरातील मद्यविक्रीवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका सुनावणीत न्यायालयाने शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय महामार्ग स्थानिक संस्थांकडे वर्ग करण्यात काहीच गैर नसल्याचा निर्वाळा दिल्यामुळे या मार्गावर शहरात असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने मद्यविकेत्यांना काहीसे हायसे वाटले आहे. न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे.चंदीगढ सरकारने शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे हस्तांतरण करून जिल्हा मार्ग, असे नामकरण केले परिणामी या मार्गावरील मद्यविक्रीचे दुकाने सुरू करण्यातील अडथळा दूर झाला. सरकारच्या या निर्णयाला एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्ग हस्तांतरण करण्यात गैर काहीच नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे पंजाब व हरियाणा राज्य सरकारने अशा प्रकारचे घेतलेल्या निर्णयांना तसेच महाराष्ट्रातीलही काही मार्गाचे केलेले हस्तांतरण योग्य ठरू पहात आहे. सर्वोच्च न्यायालयाने शहरातून जाणारे राष्ट्रीय व राज्य मार्ग व शहराबाहेरून जाणारे मार्गात मोठा फरक असल्याचे नमूद केले असून, शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांची गती भरधाव असते, तर शहरात मंद गतीने वाहतूक सुरू असते त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटरच्या आतील मद्यविक्री करण्याबाबत घेतलेला निर्णय व त्याची अंमलबजावणी तसेच शहरातून जाणारे मार्ग व बाहेरून जाणारे मार्ग याबाबत याचिकाकर्त्यांचे काय म्हणणे आहे ते पुढील सुनावणीत मांडावे अशा सूचनाही दिल्या आहेत.फार वर्षांपूर्वी शहरातून राज्य व राष्ट्रीय मार्ग गेले आहेत व या मार्गावर व्यवसाय करण्याच्या दृष्टिनेच मद्यविक्रेत्यांनी बार, रेस्टॉरंटची उभारणी केली आहे. त्यावेळी न्यायालयाचे कोणतेही बंधने नव्हती तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गाची रुंदी कमी होती. अशा मार्गांवर व्यावसायिकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सध्या न्यायालयाच्या निर्णयामुळे निरर्थक ठरली आहे.