शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 19, 2017 01:02 IST

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवडनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र या दोघांपैकी एकाने लुटारूंचा धाडसाने प्रतिकार केल्याने भामट्यांनी दोघांनाही लोखंडी रॉडने मारहाण करीत पळ काढला. सीटू भवन परिसरातील विशाल विसपुते हे मंगळवारी सकाळी शालक सागर थोरात यास सोबत घेऊन पैसे घेण्यासाठी एका ठिकाणी गेले होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास ते दोघे दुचाकीने घराकडे परतत असताना खुटवडनगर परिसरात त्यांना काही लुटारूंनी अडवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विशाल विसपुते यांनी लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लुटारूंनी दोघांनाही लोखंडी सळईने मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत प्रतिकार करणारे विसपुते जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेले त्यांचे शालक सागर अशोक थोरात (२३) रा. अष्टविनायकनगर, शिर्डीरोड, सिन्नर यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भरदिवसा लूटमार सीटू भवन येथील स्वप्न होम बंगल्याशेजारून जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी विसपुते यांच्या हातातील बॅग पळविण्याचा प्रयत्न केला; मात्र विसपुते यांनी त्यांना प्रतिकार केला असता तिघांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून पोबारा केला. भरदिवसा झालेल्या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.