शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीजवळ स्विफ्ट कार पळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 20:33 IST

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा उड्डाण पुलाजवळ मंगळवारी (दि. ५) पहाटे साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल येथील प्रवाशांनी भाडेतत्त्वावर घेतलेली स्विफ्ट डिझायर कारचालकाच्या डोळ्या

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. ५ : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा उड्डाण पुलाजवळ मंगळवारी (दि. ५) पहाटे साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल येथील प्रवाशांनी भाडेतत्त्वावर घेतलेली स्विफ्ट डिझायर कारचालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून व चाकूचा हल्ला करत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्या प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून न आल्याने थेट पश्चिम बंगाललाच पोलीस पथक रवाना केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील तुळजा भवानी चौकातील दर्शन सुभाष येलमामे यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १५ ईई ०५८३) ही भाडेतत्त्वावर सुप्रियो सरकार व बबली सुप्रियो सरकार (रा. नार्केल, बागनरोड, वासुदेवपूर, श्यामनगर बरादपूर, १ नार्थ २४ परगाना, पश्चिम बंगाल) या प्रवाशांनी येलमामे यांच्याकडून तीन दिवसासाठी कार भाडेतत्त्वावर घेऊन नाशिक येथून मुंबईला जात असताना इगतपुरीच्या बायपास-जवळील बोरटेंभा पुलाजवळ उलटीचा बहाणा करून कार थांबवली. उलटीचे नाटक करून पुन्हा गाडीत बसताना चालकाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून चाकूने हल्ला करत नाकाला, डोक्यावर वार करून कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इगतपुरी पोलिसांचे ग्रस्त वाहन आले. चालकाने तीव्र प्रतिकार केल्याने त्यांचा प्रयत्न फसल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. पोलिसांनीही लगेच त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. जखमी कारचालकास उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले व कारचालकाची तक्रार दाखल करून त्या दोघा जोडप्यां-विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, हवालदार विनोद गोसावी, फकिरा थोरात, ईश्वर गंगावणे, एम.एल. बोराडे, जनार्धन पगारे आदि करीत आहे. (वार्ताहर)