शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७९ लोकसेवकांवर हल्ले; पोलीस सर्वाधिक ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातसुद्धा २०२० सालात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही खात्यातील लोकसेवक गंभीर ...

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातसुद्धा २०२० सालात सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही खात्यातील लोकसेवक गंभीर जखमी झालेला नाही. शहरात ३७, तर ग्रामीण भागात ४२ सरकारी नोकरदारांना संशयिताकडून वाद घालत किरकोळ मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे.

२०२० हे वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेले. पाच महिने लॉकडाऊन व शासकीय कार्यालयात अत्यल्प कर्मचाऱ्यांची हजेरी यामुळे यावर्षी सरकारी कामात अडथळा आणल्याचे प्रकार २०१९च्या तुलनेत कमी घडले. २०१९साली नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत सुमारे ६७ लोकसेवकांना मारहाण झाली होती. या तुलनेत गेल्यावर्षी केवळ ३७ कर्मचाऱ्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागले. एकूणच यावरून प्रमाण निम्म्यावर आल्याचे दिसून येते.

त्याचप्रमाणे ग्रामीण भागातदेखील सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे प्रमाण कमीच राहिले. कोरोनामुळे अशा घटनांना वाव मिळून आला नाही. शासकीय कार्यालयांमधील लोकांची वर्दळ थांबली होती तसेच दैनंदिन जनजीवनही ठप्प झाले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. एकूण ४२ घटनांची नोंद झाली.

---इन्फो--

ग्रामीण भागात पोलीस ‘लक्ष्य’

ग्रामीण भागात १३ पोलीस, १४ महसूल कर्मचाऱ्यांसह सहा डॉक्टर, आरटीओ, शिक्षक प्रत्येकी एक तर जिल्हा परिषद, वनविभाग आणि महावितरणचे प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याची नोंद पोलिसांकडे आहे. या सर्व लोकसेवकांना किरकोळ मारहाण व शिवीगाळ केल्याचे प्रकार घडले. मालेगाव तालुक्यात ६, सिन्नरमध्ये ५ आणि नांदगावात ४ घटनांची सर्वाधिक नोंद झाली आहे.

---

पॉइंटर्स

२०२०मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर ३१ घडल्या घटना

---इन्फो---

न्यायालयांत दोषारोपपत्र

नाशिक शहर व ग्रामीण भागात गेल्या वर्षी पोलिसांवर हल्ल्यांच्या सुमारे ३१ घटना घडल्या. यामध्ये १३ घटना ग्रामीण भागात घडल्या आहेत. शहर पोलिसांनी ३६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. काही गुन्ह्यांचा तपास अद्यापही सुरू आहे.

----आलेख----

पोलीस अधीक्षक कार्यालय-१३

महसूल कार्यालय-१४

जिल्हा परिषद कार्यालय-२

---

फोटो : आर वर १२ऑफिस वर्क नावाने सेव्ह आहे.

डमी फॉरमेट आर वर १२ अटॅक ऑन आफिसर नावाने सेव्ह