शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्तांचे मूल्यांकन

By admin | Updated: September 2, 2016 23:43 IST

एसीबीची कारवाई : येवला, मनमाड येथे मोजमाप

 येवला/मनमाड : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांच्या येवला व मनमाड येथील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यात आले. येवला येथील विंचूर चौफुलीवरील छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाच्या मालमत्तेची मोजदाद करण्यासाठी शुक्र वारी सकाळी एसीबीचे तीन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे सात अधिकारी अशा दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने मूल्यांकनाच्या कामास सुरुवात करून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मूल्यांकन पूर्ण झाले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एसीबीचे तीन अधिकारी छगन भुजबळ यांच्या संपर्ककार्यालयात आले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मूल्यांकनाच्या कामास सुरुवात केली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाच अधिकारी, (पान ९ वर)तर सरकारी पंच म्हणून पंचायत समितीचे दोन अधिकारी यावेळी हजर होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, मुंबई एसीबीचे ज्ञानेश्वर आवारे यांनी मूल्यांकनप्रक्रि येत कार्यालयातील सर्व साहित्याची मोजदाद केल्यानंतर वास्तूची लांबी व रु ंदी यासह उपलब्ध साधन सामग्रीची मोजदाद केली. पंकज भुजबळ यांच्या कार्यालयाची मोजणीमाजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र व नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या मनमाड येथील रामकुंज बंगल्याचे व संपर्क कार्यालयाची मोजमाप करण्यात आली. महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकरा अधिकाऱ्यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली.भुजबळ यांचे पुत्र पंंकज भुजबळ हे २००९ मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेशी संपर्क व्हावा यासाठी त्यांनी येवलारोडवरील रामकुंज हा भव्य व अलिशान बंगला विकत घेतला होता. याच ठिकाणी संपर्क कार्यालय व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या बंगल्यावर छगन भुजबळसुध्दा कधी कधी हजेरी लावत होते.मनमाड येथील रामकुंज येथे दुपारी दीड वाजता पहिले पथक दाखल झाले, तर दुपारी ३ वाजता दुसरे पथक दाखल झाले. दोन्ही पथकांनी बंगल्यासह संपर्क कार्यालयाचे बांधकाम तसेच मोकळी जागा याची मोजदाद केली.भुजबळ यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचीही सर्व मोजमापे शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे एसीबी पथकाचे प्रमुख ए. बी. आवारे यांनी सांगितले.छगन भुजबळ व कुटुंबीयांविरोधात ज्ञात स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांच्या व कुटुंबींयाच्या नावावर वा त्यांनी धारण केलेल्या कंपनींच्या नावावर ज्या काही स्थावर मालमत्ता आहेत, त्यांचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे.