नाशिक : रोजच्या व्यस्त कार्यक्रमातून कलाकारांनाही विरंगुळा मिळावा या हेतुने ‘नाशिक जनस्थान’ या कलावंतांच्या ‘व्हॉट््स अॅप ग्रुप’तर्फे आगळ्या वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूररोड येथील सुयोजित ग्रुप मैदानावर या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अभिनेते चिन्मय उद्गीरकर, कांचन पगारे, धनश्री क्षीरसागर यांच्यासह व्हॉट््स अॅप ग्रुपमधील संगीत, कला, क्रीडा, चित्रकार क्षेत्रांतील सदस्यांनी सहभाग घेतला होता. रविवारी (दि. ७) झालेल्या या क्रिकेट सामन्यांसाठी १६ संघांतील आठ सामने खेळविण्यात आले. जिंकणे किंवा हारणे हा उद्देश न ठेवता विरंगुळा आणि ग्रुपमधल्या सदस्यांनी एकत्र यावे हाच हेतू ठेवून हे सामने भरविण्यात आले होते. अत्यंत मैत्रिपूर्ण रंगलेल्या या सामन्याचे आयोजन ग्रुपचे अॅडमिन अभय ओझरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. या उपक्रम यशस्वीततेसाठी धनंजय धुमाळ, विनोद राठोड, मोहन उपासनी, भूषण मटकरी यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
कलाकारांचे चौकार-षटकार
By admin | Updated: February 7, 2016 23:54 IST