शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपात जुंपली !

By admin | Updated: December 24, 2016 01:35 IST

शिवस्मारक भूमिपूजन : भाजपाचे वीस हजार कार्यकर्ते जाणार

नाशिक : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपात श्रेयवादाची लढाई सुरू असतानाच भाजपाने सेनेला डावलून गुरुवारी वाजत-गाजत केलेल्या गोदावरी जलकलश मिरवणुकीच्या उपक्रमाने शिवसेना दुखावली आहे. शिवसेनेने भाजपाच्या या उपक्रमाबद्दल ‘निव्वळ स्टंटबाजी’ अशी संभावना केली आहे, तर भाजपानेही प्रत्त्युत्तर देत छत्रपती शिवराय ही काय कुणा एका पक्षाची मक्तेदारी नसल्याचा टोला लगावला आहे. शिवस्मारकावरून सेना-भाजपात जुंपल्याने आगामी महापालिका निवडणुकीत संभाव्य युतीबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत. शनिवारी (दि.२४) मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय भव्य स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचा जंगी कार्यक्रम भाजपाने आखला आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर, भाजपाने देशभरातील नद्यांचे जल तसेच महाराष्ट्रातील विविध गड - किल्ल्यांवरील माती मागवत ती स्मारकाच्या ठिकाणी अर्पण करण्याचा उपक्रम निश्चित केला. त्यानुसार, गुरुवारी नाशिकमधून गोदावरीचे पवित्र जल आणि जिल्ह्यातील साल्हेर-मुल्हेर किल्ल्यावरील माती यांचा एक कलश मुंबईला वाजत-गाजत मिरवणुकीने रवाना केला. त्यासाठी रामकुंडावर जाहीर जलपूजनाचाही कार्यक्रम घेतला गेला. परंतु, या कार्यक्रमाला मित्रपक्ष शिवसेनेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. भाजपाने वाजत-गाजत केलेल्या या उपक्रमामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी संतापले असून, भाजपाला उशिरा का होईना छत्रपतींची आठवण झाल्याचा टोला लगावला आहे. भाजपाने गुरुवारी केलेला कार्यक्रम हा निव्वळ स्टंटबाजी असल्याचेही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे, तर भाजपाने याबाबत प्रत्युत्तर देत छत्रपतींचे नाव घेणाऱ्यांना कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही. कार्यक्रम सार्वजनिक असल्याने सर्वांसाठी तो खुला होता, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, भाजपाने शनिवारी होणाऱ्या सोहळ्यासाठी नाशिकमधून सुमारे २० ते २५ हजार कार्यकर्ते घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनाची धुरा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्याकडे सोपविण्यात आली असून, गिते यांनी शुक्रवारी प्रभागनिहाय भेटी देऊन प्रत्येक प्रभागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मुंबईला घेऊन जाण्यासंबंधी सूचना केल्या. सुमारे दोनशे ते अडीचशे बसेस नाशिकमधून जाणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे, तर शिवसेनेनेही आपलेही पदाधिकारी व कार्यकर्ते शिवरायांना वंदन करण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. शिवस्मारकाच्या निमित्ताने सेना-भाजपात जुंपल्याने त्याचे परिणाम निवडणुकीतील युतीवरही होतील काय, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.