शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपात दुरंगी सामना

By admin | Updated: February 16, 2017 00:31 IST

चुरस : प्रादेशिक मुद्द्याभोवती पिंगा घालणारी निवडणूक

नितीन शिंदे  ठाणगावसह्याद्रीच्या डोंगररांगेत व सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेल्या ठाणगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वनिता नामदेव शिंदे व भाजपाच्या शीलाबाई प्रभाकर हारक यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचे चित्र आहे. दरवेळच्या निवडणुकीत असणारा प्रादेशिक वादाचा मुद्दा या निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवत आहे. सिन्नरचे कोकण म्हणून ओळखला जाणारा ठाणगाव, पांढुर्ली, शिवडा हा परिसर कृषी क्षेत्रात सधन व समृद्ध आहे. तसेच येथील राजकारणही चांगलेच बहरले असल्याचे वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत दिसून येते. ठाणगाव गटात अन्य पक्षांना उमेदवार मिळाला नाही त्यामुळे या निवडणुकीत पक्षापेक्षा आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून ठाणगाव गटात माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक जिल्हा परिषद सदस्य विजयी झाला आहे. गेल्या निवडणुकीत या गटात तिरंगी लढत झाली होती. त्याचा फायदा कोकाटे समर्थक केरू पवार यांना झाला होता. त्यामुळे यावेळी मतविभागणी होऊ नये याची काळजी आमदार वाजे यांच्या गटाने घेतल्याचे दिसून येते. बाजार समितीचे माजी सभापती व ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांना गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पाच वर्षे त्यांनी गटातील जनतेसोबत संपर्क ठेवून या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती वनिता शिंदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे, तर शिवडे येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर हारक यांच्या पत्नी शीलाबाई हारक यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. शिंदे व हारक यांच्यात दुरंगी लढत होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतारांगांमुुळे हा गट घाटाखालचा व घाटावरचा अशा दोन भागात विभागला गेला आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान प्रादेशिकतेचा मुद्दा डोके वर काढत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या निवडणुकीतही तोच मुद्दा पुढे येऊ पाहात आहे. ३२ हजार २५९ मतदारसंख्या असलेल्या ठाणगाव गटात ठाणगाव व शिवडे असे दोन गण आहेत. शिवसेनेने ठाणगाव गणात वेणूबाई अशोक डावरे, तर शिवडे गणात रावसाहेब म्हसुजी आढाव यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने ठाणगाव गणातून मंगला बाळासाहेब शिंदे, तर शिवडे गणातून तातू भागवत जगताप यांना रिंगणात उभे केले आहे. ठाणगाव गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवार हौशाबाई मुरलीधर पवार यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच. सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सेना-भाजपात होत असलेल्या दुरंगी लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.