शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

वास्तुविशारदांना नकाशे मंजुरीचे अधिकार

By admin | Updated: December 27, 2014 00:42 IST

देवेंद्र फडणवीस : येत्या अधिवेशनात मांडणार विधेयक; लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक’चे प्रकाशन

नाशिक : उद्योग-व्यवसायाची स्थानिक क्षितिजे जगाशी जोडणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात जिद्द व परिश्रमाच्या बळावर यशोध्वजा फडकाविलेल्या उद्योजक-व्यावसायिकांची कर्तृत्वगाथा मांडणाऱ्या लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात झाले. यावेळी प्रगट मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलखुलासपणे संवाद साधत राज्यातील विविध प्रश्नांचा वेध घेतला. बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामासंबंधी नकाशे मंजुरीचे अधिकार चार्टर्ड आर्किटेक्टला देण्याबाबतचे विधेयक येत्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न असून, परवान्यांच्या सुलभीकरणावर भर राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच राज्यातील अनावश्यक व लोकांना त्रासदायक ठरणारे ४० टोल बंद करण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक शहरातील ४४ बिझनेस आयकॉन्स यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मान सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रगट मुलाखत लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर, नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेती, सिंचन, दुष्काळ, बांधकाम, टोलधोरण, शिक्षण आदि विषयांशी संबंधित विविध प्रश्नांना मनमोकळेपणे आणि अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या बिझनेस आयकॉन्सचा गौरव करत सांगितले, देश बनतो तेव्हा तो केवळ जमिनीचा एक तुकडा राहत नाही. देशातील नदी, नाले, समुद्र यापुरताच तो सीमित नसतो. तेथील लोकांची राष्ट्रभक्ती, राष्ट्राप्रती समर्पित वृत्ती आणि त्यांनी केलेली निर्मिती यावर त्या शहराची ओळख ठरत असते. लोकमतने सन्मानित केलेले बिझनेस आयकॉन्स हे नाशिक शहराची ओळख असल्याचे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले आणि त्यांना लोकांसमोर आणणाऱ्या लोकमतचेही अभिनंदन केले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारचा आजवर केवळ शेतकऱ्यांना दिलासा देण्यावरच फोकस राहिलेला आहे; परंतु यापुढे आता शाश्वत शेती विकासावर भर देण्यात येईल. वर्षभरात पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासंबंधी प्रयत्न केले जाणार आहेत. पीक विमा योजनेसंबंधी पुनर्विचार सुरू आहे. उसाची शेती सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे बंधनही साखर कारखान्यांवर टाकले जाणार आहे. प्रादेशिक समतोल राखून ५० टक्के प्रकल्प पुढच्या पाच वर्षांत तयार झाले पाहिजेत, अशी योजना आखण्याचे काम सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. बांधकाम नियंत्रण नियमावलीनुसार बांधकामासंबंधी प्राथमिक नकाशे मंजुरीचे अधिकार चार्टर्ड आर्किटेक्टला देण्याबाबतचे विधेयक येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून, वास्तुविशारदाने पंधरा दिवसांत नकाशा मंजूर करून तो महापालिकेला सादर केला पाहिजे. मात्र, आरक्षण आणि बांधकाम नियंत्रण नियमावलीविरुद्ध जाऊन मंजुरीचा प्रकार निदर्शनास आल्यास त्यासाठी सहा महिने तुरुंगवासाची सजा देण्याचीही तरतूद केली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. टोलप्रश्नी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात १२० टोल आहेत. त्यातील ४० टोल अनावश्यक आहेत. ते बंद करण्यासारखे आहेत. सरकार नवीन धोरणाची आखणी करत आहे. एलबीटी कोणत्याही परिस्थितीत रद्द करणारच असा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री म्हणाले, एलबीटीचे पर्याय आम्ही शोधलेले आहेत. (पान २ वर)परंतु जीएसटीचा कायदा येईपर्यंत एलबीटीचे उत्पन्न दाखवावे लागणार आहे. एलबीटी रद्द करताना महापालिकांनाही संकटातून बाहेर काढता येईल, अशी योजना तयार करत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अधिकाराच्या विकेंद्रीकरणावर भर देतानाच फडणवीस यांनी हाउसिंग रेग्युलटरी अ‍ॅक्ट, क्लस्टर डेव्हलपमेंट, मुंबईत एसआरए राबविण्यासाठी प्रसंगी पाच ट्रस्टच्या जागा अधिग्रहित करून घरे उपलब्ध करून देणे, जलयुक्त शिवार योजना, मोठ्या धरणांचे बांधकाम करणे, विकेंद्रित जलसाठे तयार करणे, जवळच्या कोळसा खाणी खरेदी करत वीजनिर्मितीचा खर्च कमी करणे व दर नियंत्रणात आणणे, सौरउर्जा मॉडेल तयार करणे, औरंगाबादला नॅशनल स्कूल आॅफ आर्किटेक्टर्सची उभारणी याबाबतही राज्यसरकारची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, नाशिकच्या कुंभमेळ्याला निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगतानाच फडणवीस यांनी ओझर येथील विमानतळासाठी राज्यसरकारच्या मालकीची असलेल्या टर्मिनलची इमारत एचएएलला एक रुपये भाडेतत्त्वावर देण्याबाबत प्रस्ताव केंद्रीय संरक्षणमंत्री यांच्याकडे गुरुवारीच पाठविण्यात आल्याचेही सांगितले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करताना लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी ‘बिझनेस आयकॉन्स’ मालिकेच्या प्रकाशनामागील भूमिका विशद केली. या कॉफीटेबल बुकमध्ये त्या-त्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती समाविष्ट केल्या आहेत. मुंबई-पुणेनंतर उद्योजक, कलावंत यासारख्यांची पुढची पिढी आता नाशिकसारख्या शहरांमधून पुढे येणार आहे. त्यांच्यासाठी हे आयकॉन्स निश्चितच मार्गदर्शक ठरतील. यावेळी दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत उद्योगांबाबतच्या त्यांच्या सकारात्मक भूमिकेचेहीे कौतुक केले. दरम्यान, श्रद्धेय बाबूजी तथा जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतीस वंदन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी लोकमत मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष व खासदार विजय दर्डा यांनी नाशिकमधील चित्रकार शिशिर शिंदे यांच्याकडून खास तयार करून घेतलेले चित्र मुख्यमंत्री फडणवीस यांना ऋषी दर्डा यांच्या हस्ते भेट देण्यात आले. सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकमतच्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी केले. सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी आभार मानले.