शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या धिंगाण्याला बसणार चाप

By admin | Updated: May 23, 2017 01:19 IST

नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील अकोला तालुक्यातील भंडारदरा परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक-अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील अकोला तालुक्यातील भंडारदरा परिसरात भरणाऱ्या काजवा महोत्सवामुळे रात्रीच्या वेळी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरातील नैसर्गिक जैवविविधता धोक्यात येते. पर्यटकांबरोबरच मद्यप्राशनासाठी ओल्या पार्ट्या रंगविणाऱ्यांचा धिंगाणा रोखण्यासाठी या भागात वनविभाग व अकोला पोलीस ठाणेंतर्गत गस्त वाढविली जाणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तर पहिल्या पावसाच्या आगमनापर्यंत भंडारदरा परिसरात काजव्यांची चमचम अनुभवयास येते. निसर्गाचा हा जीव कीटक स्वरूपातील असून, आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडांची पाने खाताना ते चमकतात. ही चमचम बघण्याच्या नावाखाली नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर परिसरातील पर्यटकांची या भागात संपूर्ण दीड महिना गर्दी लोटते. गुगलपासून तर पर्यटकांच्या हाती आलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमांपर्यंत सर्वांनीच ‘भंडारदरा काजवा महोत्सव’बाबत ‘ब्रॅण्डिंग’ केल्यामुळे आणि वनविभागाने सोडलेले मोकळे रान त्यामुळे पर्यटकांचा धिंगाणा आवाक्याबाहेर गेला आहे. गेल्या वर्षी पर्यटकांच्या धिंगाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जैवविविधता धोक्यात आली होती.  या भागातील निशाचर पक्षी, प्राण्यांना दीड महिना भक्ष्याच्या शोधासाठी जंगलात बाहेर पडणे मुश्कील झाले होते. वाहनांच्या हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, दिव्यांचा लख्ख प्रकाश, प्लास्टिकचा कचरा, दारूच्या बाटल्या गोंगाटामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. यामुळे काजवा महोत्सव बंद करण्याची खरी गरज असल्याचे मतदेखील काही पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.यंदा वनविभाग राहणार दक्षकाजवा महोत्सवाचे ‘ब्रॅण्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी सुमारे दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा या वृक्षांची संख्या जास्त असून, या वृक्षांवर काजव्यांची संख्या जास्त असते. काजव्यांची चमचम बघण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. यावेळी पर्यटकांबरोबरच नैसर्गिक जैवविविधतेला सुरक्षितता प्रदान करण्यासाठी वनविभाग व वन्यजीव विभाग दक्षता बाळगणार आहे. पर्यटन महामंडळ, वनविभाग, पोलीस, स्थानिक नागरिक, गाईड यांची संयुक्त बैठक सोमवारी (दि. २२) भंडारदरा येथे पार पडली.