शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर ‘एप्रिलफूल’

By admin | Updated: April 2, 2017 01:18 IST

नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक भन्नाट प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनवत ‘एप्रिलफूल’ची मजा लुटली

 नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक भन्नाट प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनवत ‘एप्रिलफूल’ची मजा लुटली. यासाठी सोशल मीडियाचा तरुणाईकडून चांगलाच वापर करण्यात आला.एप्रिल महिन्याच्या एक तारखेला ‘एप्रिलफूल’ हे समीकरण फ्रान्स व युरोपमध्ये तयार झाले. अर्थात या समीकरणामागे वेगवेगळा इतिहासही सांगितला जातो आणि संदर्भही दिले जातात. फ्रान्सने ग्रेगरियन नावाची दिनदर्शिका नाकारल्याने युरोपवासीयांनी त्यांना मूर्ख म्हणून चिडविले, हा त्या संदर्भांपैकी एक संदर्भ. एकूणच मूर्ख बनविण्याची प्रथा दरवर्षी एप्रिलच्या एक तारखेला रूढ झाली आणि जगभर पसरली. या प्रथेच्या आधारे शनिवारी शहरातील तरुणाइने आपल्या मित्र-मैत्रिणींना मूर्ख बनविण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. यासाठी तरुणाइने व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक यांसारख्या सोशल साइट्सचा वापर केला. या साइट्सवर एकापेक्षा एक भन्नाट कल्पनेतून तरुणाईने ‘एप्रिलफूल’ केले. यामुळे अनेकांना मनस्ताप तर झालाच मात्र त्यातून त्याला कारणीभूत असलेल्या तरुण, तरुणींनी आनंद शोधला हे विशेष.एकूणच श्निवार हा एप्रिलफूल राहिला. बॉलिवूडलाही ‘एप्रिलफूल’चा मोह आवरता आलेला नाही. १९६४ साली ‘एप्रिलफूल’ नावाचा चित्रपटच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात असलेले ‘एप्रिलफूल बनाया, तो उनको गुस्सा आया, इसमे मेरा क्या कसुर...’ असे मजेशीर गाणेही त्या काळी चांगलेच गाजले आहे. या गाण्याचीदेखील आज अनेकांनी आपल्या मित्र-परिवाराला आठवण करून देण्यासाठी गीताची ध्वनिफीतही व्हायरल केली. तसेच काहींनी तर खास एक एप्रिलच्या औचित्यावर या गीताची कॉलर ट्यूनच कंपनीकडून ‘सेट’ करून घेतली होती.