शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर ‘एप्रिल फूल’

By admin | Updated: April 1, 2017 22:03 IST

एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक सर्रास प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनवत ‘एप्रिल फूल’ची मजा लुटली.

नाशिक : एकमेकांना फसवून, खोट्या संकल्पना लढवून एकापेक्षा एक सर्रास प्रयोगांचा खेळ खेळत तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनवत ‘एप्रिल फूल’ची मजा लुटली. यासाठी सोशल मिडियाचा तरुणाईकडून चांगलाच वापर करण्यात आला.एप्रिल महिन्याच्या एक तारखेला ‘एप्रिल फूल’ हे समिकरण फ्र ान्स व युरोपमध्ये तयार झाले. अर्थात या समिकरणामागे वेगवेगळा इतिहासही सांगितला जातो आणि संदर्भही दिले जातात. फ्रान्सने ग्रेगरियन नावाची दिनदर्शिका नाकारल्याने युरोपवासियांनी त्यांना मुर्ख म्हणून चिडविले हा त्या संदर्भांपैकी एक संदर्भ. एकूणच मुर्ख बनविण्याची प्रथा दरवर्षी एप्रिलच्या एक तारखेला रु ढ झाली आणि जगभर पसरली. या प्रथेच्या आधारे शनिवारी शहरातील तरुणाइने आपल्या मित्र-मैत्रिणींना मुर्ख बनविण्याच्या संधीचा पुरेपुर फायदा घेतला. यासाठी तरुणाइने व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल साइट्सचा वापर केला. या साइट्सवर एकापेक्षा एक भन्नाट कल्पनेतून तरुणाईने ‘एप्रिल फूल’ केले. यामुळे अनेकांना मनस्ताप तर झालाच मात्र त्या मनस्तापातून त्याला कारणीभूत असलेल्या तरुण, तरुणींनी आनंद शोधला हे विशेष.एकूणच श्निवार हा एप्रिल फूल राहिला. बॉलिवूडलाही ‘एप्रिल फूल’चा मोह आवरता आलेला नाही. १९६४ साली ‘एप्रिल फूल’ नावाचा चित्रपटच प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात असलेले ‘एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया, इसमे मेरा क्या कसुर...’ असे मजेशीर गाणेही त्या काळी चांगलेच गाजले आहे. या गीताचीदेखील आज अनेकांनी आपल्या मित्र-परिवाराला आठवण करुन देण्यासाठी गीताची ध्वनिफितही व्हायरल केली. तसेच काहींनी तर खास एक एप्रिलच्या औचित्यावर या गीताची कॉलर ट्यूनच कंपनीकडून ‘सेट’ करुन घेतली होती.