शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरी मिळाली, मात्र कामे रखडणार

By admin | Updated: August 13, 2015 00:02 IST

निधीची अडचण : आरोग्य केंद्रांची अवस्था

नाशिक : जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्णातील डझनभर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांना वाढीव अंदाज पत्रकांसह प्रशासकीय मान्यता देण्यात आली खरी; मात्र ही कामे डिसेंबर-जानेवारीपर्यंत रखडण्याची चिन्हे आहेत. कारण कामांना पूर्ण निधी असल्याखेरीज या कामांचे निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मंजुरीवरून सदस्य व आरोग्य विभागात जुंपली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी आदिवासी भागातील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी नऊ कोटी, तर बिगर आदिवासी भागातील आरोग्य केंद्रांसाठी चार कोटींचा निधी उपलब्ध असून, त्यापैकी मागील दायित्व जाता नव्याने मंजुरीस ठेवण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मान्यतेसाठी जास्त निधी लागणार असल्याने नेमक्या किती प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या व किती रकमेच्या कामांना मंजुरी द्यावी, असा प्रश्न आरोग्य विभागाकडून उपस्थित करण्यात आला होता. मात्र सदस्य व पदाधिकाऱ्यांच्या रेट्यात मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत काही अटी- शर्तींनुसार हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात आता ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे रखडण्याची चिन्हे आहेत. कारण प्रशासकीय मान्यता देताना प्रस्तावाच्या पूर्ण रकमेस मान्यता देण्यात येते. आता जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार संपूर्ण प्रमाणात निधी उपलब्ध होणार नाही, तोपर्यंत निविदा व कार्यारंभ आदेश काढण्यास तांत्रिक अडचण येण्याची शक्यता आहे. या प्रशासकीय मान्यता निधीच्या उपलब्धतेवरच देण्यात आलेल्या असल्याने आता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडून विविध विभागांच्या निधीबाबत पुनर्नियोजन करण्यात येईल. तेव्हाच निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि तेव्हाच ही कामे मार्गी लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)