शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

मोर्चाच्या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन

By admin | Updated: September 13, 2016 00:42 IST

डांगसौंदाणे, तरसाळी, विंचूर, निफाड : मराठा समाजबांधवांच्या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची हजेरी

नाशिक : मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवार दि.२४ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चाच्या नियोजनासाठी निफाड, विंचुर, डांगसौंदाणे, तरसाळी येथे सोमवारी बैठक संपन्न झाली. लाखांहून अधिक समाजबांधव मोर्चात सहभागी होण्याचा संकल्प करण्यात आला. निफाड येथे झालेल्या सभेत माजी आमदार दिलीप बनकर म्हणाले की, मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. तालुक्यातून लाखोच्या संखेने समाजबांधव उपस्थित राहणार असल्याने या दिवशी बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अनिल कदम यांनी मोर्चाला सर्वांनी ताकद लावावी. समाजासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी वैर बाजूला ठेऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन केले.बैठकीला तालुक्यातील सर्वच पक्ष, संघटनांचे नेते, पदाधिकारी तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य, सोसायटी अध्यक्ष, नगरसेवक, सभापती, संचालक पक्षभेद विसरून उपस्थित होते. मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एक दिवस नौकरी, धंदा, शेती, सर्व काम बंद ठेवून समाजबांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे. असे ठरविण्यात आले.याप्रसंगी राजाराम पानगव्हाने, बाळासाहेब क्षीरसागर राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, सोपान खालकर आदिंसह अनेकांनी मार्गदर्शन केले. आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, राजाराम पानगव्हाणे, राजेंद्र डोखळे, अनिल कुंदे, बाळासाहेब क्षीरसागर, सोपान खालकर, वैकुंठ पाटील, उद्धव निमसे, प्रणव पवार, यतिन कदम, नानासाहेब पाटील, माणिकराव बोरस्ते, भास्कर बनकर, वाल्मीक कापसे, रमेश जेऊघाले, नंदकुमार कापसे, दिलीप कापसे, उन्मेश डुंबरे, विलास मत्सागर, नितीन कापसे, कैलास कुंदे, संजय कुंदे, उत्तम गडाख, सतीश मोरे, चंद्रकांत बनकर,लक्ष्मण निकम, हरिश्चंद्र भवर, डॉ. चांदर, डॉ. उत्तम डर्ले, संदीप तासकर, संदीप टर्ले, बाळासाहेब बनकर, देवदत्त कापसे, डॉ. नारायण लोखंडे, उल्का कुरणे,अश्विनी मोगल, कलावती चव्हाण, निर्मलाताई खर्डे, संजय वाबळे , उन्मेश डुंबरे, सिद्धार्थ वनारसे, आण्णासाहेब बोरगुडे, बापुसाहेब कुंदे, शांताराम दाते, रावसाहेब गोळे, शिवा मोरे, संजय धारराव, राजाराम दरेकर प्रगती पगार, शिवानी जेऊघाले आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोपर्डी घटनेतील अल्पवयीन मुलीला श्रद्धांजली वाहून ब राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप करण्यात आला.डांगसौंदाणेत बैठकडांगसौंदाणे : मराठा मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी बागलाण तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नियोजनाखाली बैठक पार पडली.नाशिक येथे काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या क्रांती मोर्चासाठी समाजबांधवांनी उपस्थितीत राहून मराठा समाजाची ताकद दाखवून द्यावी. आपण वेगवेगळ्या पक्षांतर्फे राजकारणात सक्रिय असलो, तरी समाजहितासाठी सर्व वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन नाशिक येथील मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे बैठकीदरम्यान आवाहन करण्यात आले.आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने मनापासून मोर्चात सहभागी व्हावे, मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे रामचंद्र बापू पाटील, जि. प. सदस्य अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, वसंत भामरे आदिंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल सोनवणे, अंबादास सोनवणे, रवींद्र सोनवणे, महेंद्र सोनवणे, मुन्ना सोनवणे, निवृत्ती सोनवणे, सोपान सोनवणे, सुशीलकुमार सोनवणे, आबा सोनवणे, कडू सोनवणे, राजेद्र सोनवणे, अमोल सोनवणे, बबलू सोनवणे, दीपक खैरनार, महेश सोनवणे, सचिन सोनवणे, संदीप सोनवणे आदिंसह समाजबांधव उपस्थित होते.तरसाळीतरसाळी : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे मोर्चासंदर्भात बैठक घेण्यात आली.येथील मारुती मंदिरात बैठक संपन्न झाली. मराठा समाजावर अन्याय होऊ नये या मागण्यांसाठी नाशिक येथे मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील यांनी सांगितले.यावेळी काका रौंदळ, प्रशांत सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, अनिल पाटील, संजय सोनवणे, पांडुरंग सोनवणे, अरविंद सोनवणे अनिल चव्हाण, वसंत भामरे, प्रकाश निकम, संदीप खैरणार, महेश निकम आदि पदधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. विंचूर : येथील बैठकीत विंचूर व परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी बैठका घेणे, पोस्टर्स लावणे, नाशिकला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. रमेश सालगुडे, शंकर दरेकर, राजाराम दरेकर, ज्ञानेश्वर घायाळ, अ‍ॅड. विनोद गुंजाळ, मनोज बोराडे, किशोर मवाळ, संधान, पप्पू खापरे, रणजित गुंजाळ आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शंकर दरेकर यांनी केले. बैठकीला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.चांदवडचांदवड : नाशिक येथे दि. २४ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मार्चाच्या नियोजनासाठी दि. १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत तालुक्यात गावनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार शिरीष कोतवाल, बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर, डॉ. सयाजीराव गायकवाड, अ‍ॅड. नितीन ठाकरे बैठकीत सहभाग नोंदवत आहे. सोमवारी दुगाव गटातील राहुड, कळमदरे, सुतारखेडे, डोगंरगाव, उसवाड, दरेगाव, डोणगाव, निमोण, वराडी, वाद, कानडगाव, शिंगवे, वाघदर्डी, वडगावपंगू, कातरवाडी, भडाणे, रायपूर आदि गावांमध्ये बैठका संपन्न झाल्या. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे दत्तात्रय गांगुर्डे, प्रशांत गायकवाड आदिंसह सर्व मराठा संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी (दि. १३) तळेगाव गटातील निमगव्हाण, पाथरशेंबे, नन्हावे, पन्हाळे, अहिरखेडे, गंगावे, निंबाळे, तळेगावरोही, वाकी खुर्द, वाकी बु।।, काळखोडे, साळसाणे, वाहेगावसाळ, रेडगाव खुर्द, काजीसांगवी, सोनीसांगवी, कोलटेक पाटे, दहिवद, दिघवद अशा दिवसभर बैठका होणार असल्याची माहिती देण्यात आली. (लोकमत चमू)