शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष उत्पादकांना जागरूकतेने व्यवहार करण्याचे आवाहन

By admin | Updated: January 22, 2015 00:30 IST

द्राक्ष उत्पादकांना जागरूकतेने व्यवहार करण्याचे आवाहन

वणी : दिंडोरी तालुक्यातील काही भागात द्राक्ष खरेदीसाठी परप्रांतीय व्यापारी डेरेदाखल झाले असून, त्यांच्याकडून द्राक्ष खरेदीही सुरू झाली आहे. मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात द्राक्षाचे पैसे न देता पोबारा होण्याचे प्रकार घडल्याने द्राक्ष उत्पादकांनी जागरूकतेने द्राक्षविक्रीचा व्यवहार करण्याचा सूर उत्पादकांत उमटत आहे.दिंडोरी तालुक्यात शेकडो एकर द्राक्षबागा असून, सदर नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतोे. द्राक्षलागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रचंड द्राक्षे तालुक्यात उत्पादित होतात. यात काही निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करणारे उत्पादकही आहेत. निर्यातक्षम द्राक्षे खरेदी करणाऱ्या निर्यातदारांचा पारदर्शी व्यवहारप्रणालीचा नावलौकीक आहे. त्यामुळे अशा उत्पादकांचे पैसे बुडण्याची भीती कमी मात्र देशांतर्गत द्राक्षे खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हा धोका जास्त आहे. चढ्याभावाचे आमिष दाखवून द्राक्षेखरेदी करणे, भाव ठरविताना एक भाव सांगणे व पैसे देताना कमी भावाने पैसे देणे तसेच रोख व्यवहाराची हमी देणे मात्र वेळोवेळी पैसे देण्याचे वायदे करणे किंवा उत्पादकांची अडवणूक करणे व द्राक्षे खरेदीच्या अंतिम टप्यात पैसे न देता द्राक्षे खरेदी करून पलायन करणे अशा प्रकारांना प्रतिवर्षी उत्पादकांना सामोरे जावे लागते व उत्पादकांची फसवणूक होऊन आर्थिक कोंडी होते. परप्रांतीय व्यापाऱ्यांवर विश्वास ठेवून उत्पादक व्यवहार करतात. या व्यवहाराची लिखापढी नसते. तोंडी झालेल्या व्यवहारामुळे याला कायदेशीर आधार नसतो. याचाच गैरफायदा असे व्यापारी घेत फसवणूक करतात. फसवणुकीची तक्रार पोलिसात दिल्यानंतर पोलीस व्यापाऱ्याची पूर्ण माहिती विचारतात; मात्र उत्पादकाला व्यापाऱ्याने दिलेली माहिती पोलिसांना दिली ती खोटी असल्याचे पुढे येते. असे प्रकार घडले आहेत व याची पुनरावृत्तीची शक्यता आहे. हे सर्व माहीत असतानाही उत्पादक नाइलाज म्हणून व्यवहार करतात. कारण शासनाचे अशा व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याची विशेष प्रणाली नाही त्यामुळे फसवणुकीच्या मालिकेला पूर्णविराम मिळत नाही. यातूनमार्ग काढून उत्पादकांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)