शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे पुढचे पाऊल : सामाजिक न्याय प्रस्थापित करणार

By admin | Updated: December 22, 2014 00:43 IST

दत्तक योजनेचा पथदर्शी प्रयोग

 राकेश जोशी   नाशिकअहमदनगर जिल्हा म्हटला म्हणजे डोळ्यासमोर येतात ते युवकांची निर्घृण हत्त्या, दलित तरुणाचा खून, जवखेड्यातील हत्त्याकांड यासह मन सुन्न करणाऱ्या विविध प्रकारच्या विदिर्ण घटना. गेल्या काही वर्षात घडलेल्या या घटना पाहता सामाजिक ऐक्याची वीण घट्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढचे पाऊल उचलले आहे. त्याची सुरुवात दि. १८ जानेवारीपासून होत आहे. या प्रयत्नांना यश येण्याचा अंनिसला विश्वास आहे.गेल्या काही वर्षात अत्याचाराच्या जेवढ्या घटना घडल्या त्यातील अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या घटना हादरवणाऱ्या होत्या. सोनईत वाल्मीकी समाजातील तीन युवकांची हत्त्या, खर्डा गावात शाळेत शिकणाऱ्या दलित तरुणाचा खून, जवखेडा दलित हत्त्याकांड. या सगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्या. यातून समाजमन हादरले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनांचा बारकाईने अभ्यास करत त्याच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. समितीने सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी, सामाजिक न्यायाची संकल्पना मनामनात रुजविण्यासाठी पथदर्शी प्रयोग करत हा जिल्हाच दत्तक घेण्याचे ठरविले. जातीय अत्याचाराच्या विरोधात एखादा प्रयोग करण्यासह सामाजिक न्यायाची प्रस्थापना हेच प्रभावी माध्यम असू शकते, असा विश्वास असल्यानेच अंनिसने हे पाऊल उचलले आहे. शिक्षक, ग्रामस्थ, प्रशासन, पोलीस, सामाजिक संघटना, यांच्या सहभागातून प्रबोधन मोहीम प्रयोग यशस्वी करण्याचे अंनिसपुढे आव्हान आहे. त्यासाठी प्रशासनाचीही मदत घेत पुढील तीन वर्ष प्रबोधनाचे काम करण्यात येणार आहे.