शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या स्थानिक नेत्यांवर नाराजी

By admin | Updated: February 5, 2017 00:48 IST

उमेदवारी डावलली : निवडणुकीत ‘काम दाखवू’

नाशिक : शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज वाटप करताना निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात असून, पक्षाचे अनेक वर्षे काम करूनही उमेदवारी देताना डावलले गेलेल्यांनी आता निवडणुकीत ‘काम दाखवू’ अशी भाषा करण्यास सुरुवात केली आहे.  या निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या नातेवाईक, हितचिंतक, समर्थकांना उमेदवारी देण्यात धन्यता मानली, तर उर्वरित ठिकाणी ऐनवेळी पक्षात आगमन झालेल्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे पक्षाचे काम करूनही प्रत्यक्ष उमेदवारी देताना कार्यकर्त्यांवर पुन्हा झेंडे उचलायचीच वेळ आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांच्या दोन्ही कन्यांना उमेदवारी देऊनही जर घोलप नाराज होत असतील तर ज्या निष्ठावान सैनिकांना उमेदवारी दिली नाही, त्यांनी काय पवित्रा घ्यावा? असा सवाल आता केला जात आहे. विनायक पांडे यांच्याही घरातील दोन व्यक्तींना उमेदवारी देण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते तळमळले, ऐनवेळी पक्षात आलेल्या शिवाजी चुंबळे यांच्या घरातही दोन तिकिटे देण्यात आली, मग स्थानिक निष्ठावान सैनिकांनी जायचे कुठे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवसेनेची उमेदवारी देताना पक्ष निष्ठेपेक्षा उमेदवाराची आर्थिक परिस्थिती, नेत्यांशी असलेले लागेबांधे व निवडून येण्याची क्षमता एवढ्याच गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याची टीकाही आता केली जात आहे.