शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी अद्याप पगाराविनाच

By admin | Updated: August 14, 2014 21:51 IST

अंगणवाडी कर्मचारी अद्याप पगाराविनाच

 

नाशिक : महापालिकेच्या सुमारे साडेआठशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दहा टक्के वाढ देण्याची घोषणा करण्यात आली खरी; परंतु वाढीव वेतन दूरच प्रत्यक्षात दोन महिन्यांचे नियमित वेतनच मिळालेले नसून त्यामुळे चूल कशी पेटवावी, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेच्या ४१९ अंगणवाड्या असून, त्यात साडेआठशे सेविका आणि मदतनीस काम करतात. या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात या कर्मचाऱ्यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी महापौरांनी बोलावलेल्या गटनेत्यांच्या बैठकीत दरवर्षी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दहा टक्के वाढ करावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु मानधनात कोणतीही वाढ झाली नाही. यंदाच्या वर्षी महापौरांनी अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ देण्यासाठी अंदाजपत्रकात जादा आर्थिक तरतूद केल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता मानधनातील वाढ मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु दोन महिने झाले तरी या कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन नाहीच, तर नियमित मानधनही मिळालेले नाही. सर्व कर्मचारी पालिका प्रशासनाकडे उंबरठे झिजवत आहेत, परंतु त्याचा उपयोग होत नाही. आयुक्तांकडे फाईल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस असताना या महिलांना वेतन नाही. रक्षाबंधनाचा सणही असाच गेला. आता गौरी-गणपती तोंडावर असून, पालिकेच्या उदासीनतेमुळे या कर्मचाऱ्यांना चुली कशा पेटवायचा असा प्रश्न पडला आहे.सदरच्या साडेआठशे महिलांनी आपल्या कामगार संघटनेत सामील व्हावे यासाठंी सर्वपक्षीय प्रयत्न सुरू आहेत. परंतु या कर्मचारी कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्यानेच वाढीव आणि नियमित मानधन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या सेविकांनी केला आहे. (प्रतिनिधी)