शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांची दुरुस्ती ग्रामनिधीतून करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:08 IST

जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

नाशिक : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक गुरुवारी (दि.७) झाली. बैठकीत महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातून अंगणवाडी इमारती दुरुस्तीची मागणी आहे. मात्र त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध नाही. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर महिला व बालकल्याण विभागासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्रपणे राखीव निधी असतो. ग्रामपंचायतींनी या निधीमधून सन २०१७-१८च्या आर्थिक वर्षात प्राधान्याने अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. या ठरावानुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांनी त्वरित कारवाई करण्याबाबतचे परिपत्रक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी त्वरित काढण्याच्या सूचना सभापती अपर्णा खोसकर यांनी दिल्या. जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव या एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेल्या. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी कविता धाकराव यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करावा, अशा सूचना सभापती अपर्णा खोसकर यांनी दिल्या. बैठकीस सदस्य गणेश अहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कमल अहेर, सुनीता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे आदी उपस्थित होते.