शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रोमिंगपासून अमरनाथ यात्रेकरू वंचित

By admin | Updated: July 15, 2016 01:02 IST

नो-नेटवर्क : बीएसएनएलचा गलथान कारभार

 नाशिक : राज्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला गेले आहेत. राष्ट्रीय रोमिंगची मोफत सुविधा असल्याने बहुसंख्य नागरिकांनी भारत संचार निगम कंपनीचे (बीएसएनएल) पोस्टपेड, प्रीपेड मोबाइल सीमकार्ड घेतले; मात्र महाराष्ट्र सीमा ओलांडल्यानंतर कुठल्याही प्रकारची रोमिंग सुविधा ग्राहकांना मिळत नसल्याने यात्रेकरूंची मोठी गैरसोय होत आहे.अमरनाथ यात्रेसाठी शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू गेले आहेत. शनिवारपासून (दि.१३) काश्मीर खोरे धगधगत असून, श्रीनगरपासून तर थेट बालटालपर्यंत निदर्शने आणि जाळपोळ फुटीरवाद्यांकडून केली जात आहे. त्यामुळे पृथ्वीवरील नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सध्या वणवा पेटला आहे. हिजबुल मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी कमांडर बुरहान वाणीला सैन्याने कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे पेटले आहे. फुटीरवाद्यांनी सैन्य, पोलीस, यात्रेकरूंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे अमरनाथ यात्रेवरही मोठा परिणाम झाला आहे. अशा तणावपूर्ण स्थितीत बीएसएनलचे सीमकार्ड ‘नो-नेटवर्क’ दाखवित असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातून गेलेल्या यात्रेकरूंचा संपर्क त्यांच्या नातेवाईक-मित्र परिवारापासून तुटला आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणास्तव भारतीय सैन्याने जम्मू येथून काश्मीर, श्रीनगरकडे यात्रेकरूंना जाण्यास सध्या मज्जाव केला आहे. अमरनाथ यात्राही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सीमकार्डला कुठल्याही प्रकारची रेंज मिळत नसल्याने यात्रेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. काश्मीर खोऱ्याच्या बातम्यांनी नातेवाईक चिंतेत असताना त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क साधता येत नसल्याने यात्रेकरू हतबल झाले आहेत. (प्रतिनिधी)