शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

अमर तुका झाला...अभंगवाणी : मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

By admin | Updated: March 15, 2017 22:52 IST

नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी...,’ ‘अमर तुका झाला... यांसारख्या एकापेक्षा एक सरस अपरिचित अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नाशिक : ‘जय जय राम कृष्ण हरी...,’ ‘प्रथम आरंभी लंबोदर...’, ‘अमर तुका झाला...’, ‘प्रथम आरंभी लंबोदर...’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस अपरिचित अशा अभंगांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.निमित्त होते, गंगापूररोडवरील डॉ. कूर्तकोटी सभागृहात शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘अमर तुका झाला...’ या अभंगवाणी कार्यक्रमाच्या आयोजनाचे. यावेळी पंडित चंद्रशेखर वझे यांनी प्रारंभी रामकृष्ण हरीची भक्ती करत गणेशवंदना सादर केली. त्यानंतर ‘अमर तुका झाला...’ हे अभंग सादर करताच श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत अभंगाच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. गंगापूररोड परिसरासह शहरातील विविध भागांमधून नागरिक मैफलीला उपस्थित होते. या मैफलीचे वैशिष्ट्य म्हणजे वझे यांनी प्रत्येक अभंगाच्या प्रारंभी त्या अभंगाचा अर्थ अत्यंत मार्मिक पद्धतीने उपस्थिताना समजावून सांगितला. यामुळे अभंगामध्ये भाविकांची अभिरूची वाढण्यास मदत झाली व श्रोत्यांनी तल्लीन होत मैफलीचा आनंद लुटला. मैफलीच्या पहिल्या टप्प्यात वझे यांनी संत तुकोबारायांच्या साक्षात्कार अवस्थेचे वर्णन विविध अभंगांमधून करण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात त्यांनी संत शिरोमणी तुकोबारायांनी साक्षात्कारातून साधलेल्या समाज उन्नतीचे वर्णन विविध अभंगांमधून सांगितले. दरम्यान, तुकोबारायांना विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ त्यांनी ‘कर कटावरी तुळशीच्या माळा...’ या अभंगामधून मांडली. वझे यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), दिगंबर सोनवणे (पखवाज), ओंकार जोशी (टाळ) यांनी सुरेख साथसंगत केली. निरूपण उमेश भोर यांनी केले. संत तुकाराम यांची जीवनगाथा या कार्यक्रमाद्वारे वझे यांनी विविध अभंगांद्वारे श्रोत्यांपुढे सादर करण्याचा प्रयत्न केला.