शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कचराकुंडी खरेदीत गैरव्यवहाराचा आरोप

By admin | Updated: January 24, 2017 23:02 IST

चौकशीची मागणी : आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे आयुक्तांना निवेदन

मालेगाव : प्लॅस्टिक कचराकुंड्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केला असून या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनपा आयुक्त रवींद्र जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  मालेगाव महापालिकेतर्फे शासनाच्या १४ व्या वित्त अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, हरितपट्टा विकसित करण्यासाठी वाहन व साहित्य खरेदी करण्याचा निर्णय ३ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या महासभेत ठराव क्रमांक ११ नुसार घेण्यात आला. त्या ठरावाच्या अनुषंगाने स्वच्छता व मलेरिया विभागासाठी नित्योपयोगी साहित्य पुरवण्याबाबत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यात कचराकुंडी खरेदीस मान्यता देण्यात आली आहे.  शहर स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात, प्रमुख चौकांमध्ये एकूण ५०० गार्बेज बीन्स ठेवण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम्ही मालेगावकर समितीने केला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या कचराकुंड्यांच्या किमतीपेक्षा जास्त दराने कचराकुंड्या खरेदी करण्याचा घाट रचला गेला आहे. यात महापालिकेचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर कंपनीचे वितरक यांनी जास्त प्रमाणात कुंड्या खरेदी केल्यास दोन हजार ८७० रुपयांत सर्व करांसाहित १ कुंडीप्रमाणे देण्याचे मान्य केले आहे. सदर गार्बेज बीन्स खरेदीत महाघोटाळा झाला आहे. ओम सेल्स कार्पोरेशन कंपनीकडून तब्बल ४ ते ५ पट वाढीव किमतीमध्ये खरेदी झालेल्या या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निखिल पवार, रविराज सोनार, राहुल देवरे, देवा पाटील, विवेक वारुळे, रफिक इकबाल सिद्दीकी, हेमंत चव्हाण, सचिन खैरनार, अतुल लोढा, गणेश जंगम, कलीम अब्दुल्ला, भाग्येश कासार, विजय देशपांडे, गीतेश बाविस्कर, संजय सोनजे आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)