शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांचे टार्गेट भाजपा !

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

गुन्हेगारी, नोटाबंदी, पैशांची मागणी ठरणार प्रचाराचे मुद्दे

नाशिक : शहरातील नामचीन गुंडांना पक्षप्रवेश देऊन पावन करणे, उमेदवारी देण्यासाठी उघड उघड पैशांची मागणी करणे याचबरोबर केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा सर्वसामान्यांना फटका बसणे हेच महापालिका निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे राहणार असून, मित्रपक्ष सेनेसह सर्व विरोधी पक्षांच्या रडारवर ‘भाजपा’ हाच एकमेव पक्ष राहणार आहे.केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने निवडणुकीनंतर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडल्याची भावना शिवसेनेसह रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षामध्ये पसरली असून, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ते आणखीच उघड झाले आहे. त्यामुळे या पक्षांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार असून, महापालिकेच्या निवडणुका स्थानिक प्रश्नावर लढविल्या जातात ते पाहता नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने आजवर दिलेल्या गुन्हेगारांना आश्रयाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याचा विचार विरोधी पक्षांनी करून ठेवला आहे. ज्यांच्यावर खून, खंडणी, प्राणघातक हल्ला करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे, ते पाहता शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विरोधी पक्षात असताना भाजपाने नेहमीच कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून तसेच गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलने केली असल्याने आता तोच मुद्दा त्यांच्याविरुद्ध वापरला जाणार आहे. त्याचबरोबर स्वच्छ व शुद्ध राजकारण करण्याची भाषा एकीकडे करीत असताना दुसरीकडे पक्षाची उमेदवारी पैसे घेऊन वाटण्याचा बाजारच भाजपाने मांडल्याच्या ध्वनिचित्रफिती एका मागोमाग व्हायरल होत असल्याची बाब विरोधकांच्या पथ्थ्यावर पडली आहे. याच मुद्द्याच्या आधारे भाजपाला घेरण्याची तयारी केली जात असून, सामान्यांना बॅँकेतून पुरेसे पैसे मिळत नसताना भाजपा त्यांच्या उमेदवारांकडे दोन लाखाची मागणी कशाच्या आधारे करते? दहा लाख रुपये त्यांचे इच्छुक उमेदवारीसाठी कोठून आणतात, अशा प्रश्नांची उत्तरे आता भाजपाला द्यावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)