शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधच

By admin | Updated: November 4, 2014 00:20 IST

महापौर मुर्तडक : गिते संपर्क क्षेत्राबाहेरच

मनसेचे सर्व नगरसेवक एकसंधचमहापौर मुर्तडक : गिते संपर्क क्षेत्राबाहेरचनाशिक : मनसेचे नेते वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक नगरसेवकदेखील त्यांच्या समर्थनासाठी हीच भूमिका घेणार असल्याची चर्चा असली, तरी ही केवळ अफवाच आहे. सर्व नगरसेवक एकत्रच असून, कोणीही राजीनामा दिलेला नाही, अशी माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. अर्थात, गिते यांची पक्षावर कोणतीही नाराजी नसल्याचा दावा करताना, राजीनाम्याच्या घटनेनंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे महापौरांनी सांगितले.मनसे नगरसेवकांची ओळखपरेड बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर अशोक मुर्तडक यांनी मनसेच्या सर्व नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या असे सांगितले. गिते यांनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे ते अन्य पक्षात जाण्याबाबत प्रश्नच नाही. त्याचबरोबर दुपारी राजीनाम्याची माध्यमांमुळेच माहिती मिळाली परंतु भेट झालेली नाही, असे त्यांनी सांगितले. शशिकांत जाधव यांनी नगरसेवकांच्या बैठकीत त्यांना त्यांच्या काही भावना असतील तर व्यक्त करण्यास सांगितले होते; परंतु कोणीही वेगळी भूमिका व्यक्त न केल्याने सारेच नगरसेवक पक्षाबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सातभाई यांनी कोणत्याही नगरसेवकाने राजीनामा दिला नसल्याचे सांगून, सोमवारी बोलावलेल्या बैठकीस केवळ चार नगरसेवक बाहेरगावी गेल्याने उपस्थित नव्हते बाकी सर्वच उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)साफसफाई शहराचीकी मनसेची?४नगरसेवकांच्या बैठकीत तटबंदी करणाऱ्या मनसेच्या महापौरांना माध्यम प्रतिनिधींनी अनेक प्रश्न विचारले आणि गिते यांनी पक्षाचा राजीनामा दिला नसताना नगरसेवकांच्या फुटीच्या भीतीतून बैठक बोलावली काय, असा प्रश्न केला. यावर महापौरांनी आपण शहराच्या साफसफाईबाबत नगरसेवकांशी चर्चा केली, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु ही साफसफाई शहराची की मनसेची, हे मात्र स्पष्ट केले नाही.