शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: May 25, 2017 01:46 IST

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गवळी समाजबांधव व सर्वपक्षीयांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : सिन्नरफाटा येथील चार वर्षे वयाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व यातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी गवळी समाजबांधव व सर्वपक्षीयांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता मोर्चा काढण्यात आला होता. सिन्नरफाटा येथे काही दिवसांपूर्वी एका फरसाण कारखान्याच्या मालकाने कारखान्यात कामाला असलेल्या महिला कामगाराच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या अमानवी गुन्ह्यातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी गवळी समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुर्गा उद्यान येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर शांतता न्याय मोर्चा काढला होता. दुर्गा उद्यान येथून निघालेला मोर्चा मुक्तिधाम, बिटको, गोरेवाडी रस्ता मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांच्या हाती निषेधाचे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, लैंगिक अत्याचाराचा निषेध असो असे फलक होते. मोर्चामध्ये लहान मुली, युवती, महिला, नागरिक, गवळी समाजबांधव व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते हाताला काळ्या रीबिन बांधून कुठलीही घोषणा न देता मूक मोर्चा काढला होता. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त उन्मेष महाजन यांना गवळी समाजाच्या पाच मुलींनी दिलेल्या निवेदनात सदर खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, पुराव्यात कसूर होऊ नये, पीडित बालिकेचे तिच्या कुटुंबीयांसह पुनर्वसन व्हावे, आरोपीस फाशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष किसन हुंडीवाले, प्रांताध्यक्ष हिरामण गवळी, उमाकांत गवळी, अनिल कोठुळे, सोमनाथ हिरणवाळे, सागर गवळी, बापु निस्ताणे, विजय घुले, अमोल घुगरे, जगन गवळी आदींसह शहर-जिल्ह्यातील गवळी समाजबांधव, महिला, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक सूरज बिजली, मंगेश मजगर, सुदाम भुजबळ आदिच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.