शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत सलग दुसऱ्यांदा चुकणार अक्षय तृतिया मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक : शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात येणार असून बुधवार (१२) पासून शहरात टा‌‌ळेबंदीची ...

नाशिक : शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी वाढविण्यात येणार असून बुधवार (१२) पासून शहरात टा‌‌ळेबंदीची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. अशा परिस्थिती पुढील आठवड्यात शुक्रवारी (दि.१४) अक्षय तृतीया असल्याने सलग दुसऱ्या वर्षी नाशिकच्या बाजारपेठेत ग्राहक आणि व्यावसायिकांचाही मुहूर्त चुकणार आहे.

गुढीपाडव्याच्या अक्षय तृतीय साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने यादिवशी कोणतेही शुभ काम करण्यास नागरिक प्राधान्य देतात. विशेष म्हणजे या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांचीही संख्या मोठी असते. विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने याकाळात बाजारपेठेतही उत्साह संचारलेला असतो. या मुहूर्तावर साेने, वाहन, घर व गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला नाशिककरांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे काही जण नवीन उद्योग-व्यावसाय सुरू करतात. मात्र, यावर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत कडक निर्बंध असल्याने सराफा व वाहन व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांनाही मोठा फटका बसणार आहे. शासनाने बाजारपेठेत लागू केलेल्या निर्बंधांमुळे सराफा पेढ्या बंद राहणार असल्याने या मुहूर्तावर बुक झालेल्या तसेच लग्नसराईकरिता घेतलेल्या दागिन्यांच्या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या या विवंचनेत व्यावसायिक आहेत. शहरात या व्यवसायावर किमान पाच ते सात हजार बंगाली कारागीर उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आता त्यांना सराफा बाजारात काम करता येणार का? याचीही चिंता सतावत आहे. गतवर्षीही काेराेनामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकल्याने सराफा व्यावसायिकांचे माेठे नुकसान झाले हाेते. हीच परिस्थिती वाहन विक्रेत्यांचीही आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकमध्ये सुमारे सातशे ते साडेसातशे चारचाकी, तर दीड हजाराहून अधिक दुचाकी वाहनांची विक्री होते. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही या व्यवसायाला फटका बसणार आहे. खास अक्षय तृतीयेचाचा मुहूर्त साधण्यासाठी वाहने बुक करणाऱ्या ग्राहकांनाही वेळेत डिलिव्हरी देऊ शकणार की नाही याविषयी व्यावसायिकांसमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.

इन्फो-

विश्वासात न घेतल्याने नाराजी

अनलॉकनंतर काहीकाळ या व्यावसायिकांनी सुरळीत व काेराेना नियमावलीचे काटेकोर पालन करून व्यवसाय सुरू ठेवला. नाशिकमध्ये तर सराफा व्यावसायिकांनी ‘आपले दुकान, आपली जबाबदारी’ अशी मोहीम सुरू करीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत व्यवसाय सुरू ठेवला होता. मात्र, तरीही व्यावसायिकांच्या संघटनांना विश्वासात न घेता अशाप्रकारे कडक निर्बंध लावण्यात आल्याने नाराजीची भावना व्यावसायिकांत पहायला मिळत आहे.

कोट-१

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर विवाह सोहळ्यासह विविध शुभकार्यांच्या निमित्ताने मोठ्या ऑर्डर्स असतात; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्बंधांच्या निर्णयाला सहकार्य करण्याशिवाय सामान्य नागरिक आणि व्यावसायिक यांच्या हातात काहीही नाही. दरवरर्षी या मुहूर्तावर सुमारे ३० ते ३५ कोटींची उलाढाल होत असते. मात्र यावर्षी व्यावसाय पूर्णपणे बंद राहणार आहे.

गिरीश नवसे, अध्यक्ष नाशिक सराफा असोसिएशन.

कोट-२

नाशिक शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जवळपास हजार ते दीड हजार दुचाकी वाहनांची विक्री होते; परंतु सलग दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर व्यवसाय होऊ शकलेला नाही. त्यामुळे वाहन बाजाराला मोठा फटका बसला आहे, भारतीय संस्कृतीत मुहूर्त साधून वाहन खरेदीची परंपरा आहे. मात्र, दोन वर्षांपासून मुहूर्त चुकत असल्याने वाहन बाजाराला मोठा फटका बसला आहे.

- प्रकाश खैरनार, वाहन विक्री व्यवस्थापक