शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय’ प्रकाशभारनियमनाने वाढली पुन्हा अस्वस्थता

By admin | Updated: May 23, 2017 16:25 IST

राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन

नाशिक : राज्यात वाढती विजेची मागणी आणि त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा वीस वीस तास सुरू झालेले अघोषित भारनियमन यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून देणाऱ्या अक्षय प्रकाश योजनेचे स्मरण होत असून, काही ठिकाणी तर आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे या योजनेची पुनर्रुज्जीवनाची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे.ग्रामीण भागात वारंवार वीज समस्येला जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर २००५ मध्ये आधी अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर जवळ जऊळके कडलग या गावात आणि नंतर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. त्यानंतर ती राज्यभर पसरत असतानाच महावितरणने ती तात्पुरती स्थगित करण्याच्या नावाखाली बंद पाडली. वास्तविक या योजनेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च महावितरणला सोसावा लागत नव्हता. साधारणत: सकाळी आणि सायंकाळी सहा ते दहा यावेळात विजेची मागणी अधिक असते आणि त्याच वेळेत अधिक वीज खेचणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रीक शेगड्या, पाणी तापवण्याच्या क्वाइल्स अशाप्रकारची साधने वापरली जातात. विजेचा भार वाढल्याने रोहित्र बिघडते आणि घरगुती विजेची उपकरणेदेखील निकामी ठरतात. त्यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांना एकत्र आणून आणि विश्वासात घेऊन योजना राबविण्यात आली. अति मागणीच्या वेळी जादा वीज खेचणारी म्हणजेच थ्रीफेज लागणारी उपकरणे वापरायची नाही. मुळात अक्षय प्रकाश योजना राबविण्याची सुरुवातच विजेच्या शेगड्या आणि क्वाईल जमा करण्यापासून होते. त्यानुसार योजना राबविताना ग्रामस्थांचे पथक तयार करून त्याला अधिकार दिले जातात. जी व्यक्ती जादा वीज खेचणाऱ्या साधनांचा वापर करेल किंवा आकडा टाकून वीज चोरेल त्याला आर्थिक दंड करून ती रक्कम गावाच्या कामासाठी वापरण्याचे अधिकारही देण्यात येतात. या माध्यमातून केवळ नाशिक जिल्ह्यातच दोन लाख विजेची उपकरणे नागरिकांनी काढून फेकली होती आणि वीज भारनियमनामुळे त्रस्त होऊन वीज केंद्रांवर आंदोलन आणि हल्ला करणारेच योजनेचे पुढे समर्थक बनले. नाशिक आणि नगरसह राज्यात सुमारे साडेसहा हजार गावांमध्ये अक्षय प्रकाशने ग्रामीण भागात वीस ते बावीस तास वीज उपलब्ध करून दिली होती.