शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वीज प्रश्नावर अजित पवार चिंतेत

By admin | Updated: July 1, 2014 00:42 IST

नाशिक : पावसाने दिलेली ओढ व त्यात विजेची वाढलेली मागणी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरणातील पाणी थांबविल्यामुळे कोयना, दाभोळ तर कोळशाच्या तुटवड्यामुळे पारस, भुसावळ व परळीचे संच बंद पडण्याची वेळ आल्याने सेंट्रल ग्रीड किंवा खासगी वीजनिर्मिती कंेद्रांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय त्यांनी बोलून दाखविला आहे.

नाशिक : पावसाने दिलेली ओढ व त्यात विजेची वाढलेली मागणी पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरणातील पाणी थांबविल्यामुळे कोयना, दाभोळ तर कोळशाच्या तुटवड्यामुळे पारस, भुसावळ व परळीचे संच बंद पडण्याची वेळ आल्याने सेंट्रल ग्रीड किंवा खासगी वीजनिर्मिती कंेद्रांकडून वीज खरेदी करण्याचा पर्याय त्यांनी बोलून दाखविला आहे. नाशिक येथे विविध कार्यक्रमांनिमित्त आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना विजेची सध्याची स्थिती कथन केली. कोयना धरणातील पाणी कमी झाल्याने वीज निर्मितीसाठी पाणी थांबविण्यात आल्याने कोयनेतील वीज उत्पादन बंद करण्यात आले, तर दाभोळ प्रकल्पही बंद पडला आहे. परळी केंद्रासाठी पुरेसा कोळसा नसल्याने त्याचे दोन संच बंद पडले आहेत. पारस, भुसावळ केंद्रांची अवस्थाही तशीच असून, एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी १४ दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी काळात विजेचे संकट उभे राहील. त्यासाठी पुरेसा कोळसा राज्याला मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. इतर राज्यांना ज्या प्रमाणात कोळसा मिळतो, त्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळावा म्हणून केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्याशीही संपर्क करण्यात आला आहे. राज्य सरकार सर्वतोपरि प्रयत्न करीत असून, प्रसंगी सेंट्रल ग्रीडमधून वीज घेण्यात येईल किंवा खासगी कंपन्यांकडूनही वीज खरेदी करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. आगामी रमजान महिना, पंढरपूरची वारी लक्षात घेता, वीज व पाण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. मध्यंतरी वादळामुळे अनेक टॉवर्स, विजेचे खांब उद्ध्वस्त झाल्याने वीजपुरवठ्यात अडचणी आल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.