शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 26, 2014 01:16 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट

 

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिले जाणारे विविध दाखले परस्पर देत असल्याच्या संशयावरून सुभाष सानप या एजंटास सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ रेशन कार्डवरील वडिलांचे नाव कमी करण्याच्या दाखल्यासाठी आलेल्या एका नागरिकाने तहसीलदारांक डे केलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला़ शासनाची फ सवणूक केल्याप्रकरणी सानपवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, दहावी-बारावीच्या निकालानंतर आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी एजंटांकडून अडवणूक व आर्थिक लूट केली जात आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील झा यांच्याकडून वडिलांचे रेशन कार्डवरील नाव कमी केल्याची मूळ प्रत हरवली़ मात्र त्यांच्याकडे त्याची झेरॉक्स प्रत होती़ त्यांनी तहसीलदार गणेश राठोड यांच्याकडे या दाखल्याची दुसरी मूळ प्रत मिळावी यासाठी अर्ज केला़ या अर्जावरून राठोड यांनी रजिस्टर तपासले असता कार्यालयाकडून असा दाखलाच दिला गेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी ताबडतोब झा यांना बोलावून घेऊन याबाबत विचारणा केली असता हा दाखला सुभाष सानप या एजंटकडून काढून घेतल्याची माहिती दिली़ तहसीलदार राठोड यांनी झा यांच्यासोबत कार्यालयातील दोन माणसे पाठवून एजंट सानपचा शोध घेण्यास सांगितले़ त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बसलेल्या एजंट सानपला पकडून तहसीलदारांसमोर हजर करण्यात आले़ या दाखल्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता हा दाखला मी दिला नसल्याचे सानपने सांगितले़ दरम्यान, तहसीलदार गणेश राठोड यांना त्याच्याकडील पिशवीचा संशय आल्याने त्यांनी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या सह्या व शिक्के असलेले उत्पन्नाचे, नॉन क्रिमिलिअरचे, राष्ट्रीयत्वाचे दाखले, तसेच रेशन कार्ड काढण्यासाठीचे भरलेले अर्ज आढळून आले़तहसीलदार राठोड यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात फ ोन करून एजंट सानपला पोलिसांच्या ताब्यात दिले़ या घटनेवरून एजंटांकडून शासनासह नागरिकांची फ सवणूक होत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयातही एजंटांचा सुळसुळाट झाला असून, याकडे जिल्हाधिकारी लक्ष देत नसल्याचेच दिसून येते़ यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयातून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची बनावट शिधापत्रिका बनविण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते़ या प्रकारामध्ये सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे़ (प्रतिनिधी)