शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी शेतकरी संतप्त

By admin | Updated: July 29, 2016 01:33 IST

जिल्ह्यात आंदोलन : गोणी लिलावाला विरोध

नाशिक : प्रचलित पद्धतीने कांदा खरेदी करावा आणि कांद्याला हमीभाव द्यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. कळवण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला, तर देवळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पिंंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले.गोणी लिलाव पद्धतीला विरोध म्हणून जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने करण्यात येत आहेत. गुरुवारी कळवण तालुका बंद करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरात व तालुक्यात आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये गुरुवारी संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव काही काळ बंद पाडला. पूर्वीच्या पद्धतीनेच कांदा निलाव झाला पाहिजे या मागणीसाठी ठाम असल्याने शेतकऱ्यांनी दुपारी ४ वाजता लिलाव रोखून धरला. अखेर बाजार समितीचे लिलावप्रमुख दीपक गवळी यांनी शेतकरी वर्गाची मागणी नोंदविण्यात आल्यावर लिलाव सुरू केला. देवळा येथील पाचकंदील येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल विभागाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.अभोणा येथे गोणीमध्ये कांदा विक्री विरोधात सर्वपक्षीय कडकडीत बंद पुकारून शहरातील सर्व दुकाने बंद ठेवत व्यापारी वर्गानेही शेतकऱ्यांच्या मागणीस पाठिंबा दर्शविला. अभोण्यासह कनाशी, निवाणे, पश्चिम पट्ट्यातील प्रमुख गावांमध्ये शेतकरी संतापाचा उद्रेक आज बंद पाळून बघावयास मिळाला.