शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामच्या भूसंपादनावरून पुन्हा एकदा महापालिका व शासन यांच्यात संघर्ष

By admin | Updated: May 25, 2015 01:41 IST

साधुग्रामच्या भूसंपादनावरून पुन्हा एकदा महापालिका व शासन यांच्यात संघर्ष

नाशिक : दर १२ वर्षांनी नाशिकक्षेत्री भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचा मुद्दा कळीचा ठरत असतानाच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप शहर विकास आराखड्यात साधुग्रामसाठी सुमारे २६१ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षित जागेच्या संपादनासाठी महापालिकेला सुमारे ५०० कोटी रुपये मोजावे लागणार असून, साधुग्रामच्या भूसंपादनावरून पुन्हा एकदा महापालिका व शासन यांच्यात संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. १९९३च्या शहर विकास आराखड्यात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ‘साधुग्राम’साठी खास आरक्षण न ठेवता ‘ना विकास क्षेत्र’ निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेने ५४ एकर जागा संपादित केली होती. यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड-दोन वर्षांपासून साधुग्रामसाठी जागा संपादनाचा मुद्दा गाजतो आहे. शासनाने जागा आरक्षणाची जबाबदारी महापालिकेवर सोपविली आणि १६७ एकर शेतजमिनीवर कायमस्वरूपी ‘ना विकास क्षेत्र’ घोषित करण्यासाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियमान्वये कार्यवाही सुरू केली. वास्तविक महापालिकेने एका ठरावाद्वारे सिंहस्थ ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याने साधुग्रामसाठी आवश्यक जागेचे संपादन सरकारनेच करावे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्यासंदर्भात शासनाने निर्देशित केल्यानुसार साधुग्रामसाठी १५७.९० एकर जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्याचा विषय आला असता, महापालिका महासभेने संबंधित जागामालकांना एकास दहा याप्रमाणे टीडीआर देण्याचा निर्णयही घेतला; परंतु नंतर पुन्हा एकदा शासनाने महासभेवर प्रस्ताव ठेवण्याचे निर्देशित केल्यानंतर महासभेने सहापट टीडीआर देण्याचा निर्णय जाहीर केला होता. सद्यस्थितीत सहापट टीडीआरचा विषय शासनदरबारी प्रलंबित आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी साधुग्रामच्या जागेची निकड लक्षात घेता जागामालक शेतकऱ्यांकडून भाडेपट्टीने जागा अधिग्रहित केल्या आहेत. यंदा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २९० एकर जागा महापालिकेने ताब्यात घेतली असून, त्याठिकाणी साधुग्रामची उभारणी सुरू आहे. आता नवीन प्रारूप विकास आराखड्यात ‘साधुग्राम’या शिर्षाखाली प्रथमच आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यासाठी दहा लाख ५६ हजार ४८६ चौरस मीटर क्षेत्रावर म्हणजेच सुमारे २६१ एकर क्षेत्रावर आरक्षण टाकण्यात आले असून, त्याच्या भूसंपादनाची जबाबदारी महापालिकेवर निश्चित करण्यात आली आहे. सदर जागा खासगी मालकीची आहे. त्यासाठी महापालिकेला आजच्या बाजारमूल्यानुसार सुमारे ५०० कोटी रुपये मोजावे लागणार आहे. सिंहस्थ ही जबाबदारी महापालिकेची नसून ती राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे ठामपणे सांगणाऱ्या महापालिकेला प्रारूप विकास आराखड्यातील ‘साधुग्राम’च्या आरक्षणामुळे आता कोट्यवधी रुपयांची जमवाजमव करण्याची जबाबदारी येऊन पडणार आहे. त्यातून शासन आणि महापालिका यांच्यात पुन्हा एकदा साधुग्रामप्रश्नी संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)