सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.पस्तीस-चाळीस गावांचे केंद्रस्थान असलेल्या सायखेडा येथे कांदा मार्केट, बाजारपेठेचे ठिकाण तसेच इतर अनेक उद्योगधंदे असून, या ठिकाणी नेहमीच आजूबाजूच्या गावातील लोकांची वर्दळ असते. गतवर्षी गोदावरीला आलेल्या पुरामुळे सायखेडा येथील जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. यात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सायखेडा बसस्थानकाला बसचे मुखदर्शन झाल्याने प्रवासी वर्ग सुखावला आहे.येथून उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी नाशिक किंवा इतरत्र जाणारे-येणारे प्रवासी, विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने नाशिक-सायखेडा बस पुलावरून लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरून होती. बसचे दर्शन झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. सायखेडा बसस्थानकात बस दाखल होताच चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जगन्नाथ कुटे, शिवनाथ कडभाने, सुनील कुटे, माणिक कुटे, अक्षय कुटे, महेश कुटे, भगवान कुटे, राहुल सांगळे, सागर कुटे, मनोज भुतडा, जितेंद्र रिपोटे, मदन बिरे, आदेश सानप, बाळासाहेब मुरकुटे, अमोल सानप आदींसह विद्यार्थी, प्रवासी, ग्रामस्थ उपस्थित होते.तीन वर्षांपूर्वी पायाभरणीबसस्थानकाच्या पायाभरणीचा शुभारंभ तीन-चार वर्षांपूर्वी झाला. नवीन बसस्थानक उभे राहते ना राहते तोच गतवर्षी महाड येथील दुर्घटनेनंतर जागे झालेल्या बांधकाम विभागाने सायखेडा गोदापात्राच्या जीर्ण झालेल्या पुलावरून बस वाहतुकीला बंदी घातली. त्यामुळे बºयाच कालावधीनंतर लाखो रु पये खर्च करून उभारण्यात आलेल्या नवीन बसस्थानकापर्यंत तब्बल वर्षभर बस फिरकली नसल्याने कधी स्थानकासाठी, तर कधी बससाठीची प्रतीक्षा करावी लागल्याने यात प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली होती.
एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा सायखेडा गावात बस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:17 IST
सायखेडा : सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक कमकुवत ठरविलेल्या सायखेडा येथील गोदावरी नदीच्या पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. एक वर्षापासून बस गावात येत नसल्यामुळे आतुरतेने वाट पाहावी लागत असलेली बस अखेर गावात दाखल झाली आहे. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बसचे स्वागत करण्यात आले.
एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा सायखेडा गावात बस दाखल
ठळक मुद्दे सायखेडा गावात बस दाखलएक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रवाशांना दिलासा