शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शिर्के यांच्यावरील हल्ल्यानंतर विहीप आक्रमक

By admin | Updated: February 16, 2017 01:04 IST

शिर्के यांच्यावरील हल्ल्यानंतर विहीप आक्रमक

नाशिक : गोहत्त्याबंदी कायद्याला दोन वर्षे पूर्ण होऊनही हवू तशी अंमलबजावणी केली जात नाही़ तसेच गोरक्षकांवरील हल्ल्यात वाढ झाली असून, मंगळवारी कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली़ या घटनेचा निषेध करून गोहत्त्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित पावले उचलावीत अन्यथा विश्व हिंदू परिषदेतर्फे आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी बुधवारी (दि़१५) पत्रकार परिषदेत दिला़गायकर यांनी सांगितले की, मालेगाव येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी गोहत्त्यासाठी जाणारा ट्रक अडवून ११ गोवंशाची सुटका केली़ तसेच ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला़ तर पोलिसांनी गोरक्षाचे काम करणाऱ्या शिर्केंवरच गुन्हा दाखल करून प्रमुख आरोपींना सोडून दिले़ पोलिसांची ही कृती म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचाच प्रकार आहे़ मालेगावमध्ये मोठा कत्तलखाना असून पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांवर गुन्हे दाखल करतात़ याचाच अर्थ असा होतो की गोहत्त्याबंदी कायद्याची अंमलबजावणी गोरक्षकच करीत आहेत़ पोलीस हातावर हात धरून बसले असून, कायदा हातात न घेण्याचा अजब सल्ला देत आहेत़ ठाणे, रावेर, संगमनेर, नाशिक या ठिकाणी गोरक्षकांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे़ गोरक्षक शिर्के यांना जबर मारहाण झालेली असतानाही त्यांनी शांतता ठेवण्याचा व्हिडीओ पाठविला आहे़ पोलिसांनी हल्लेखोर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही गायकर यांनी केली आहे़ यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे, गोरक्षप्रमुख रमेश मानकर, प्रचार व प्रसिद्धी प्रमुख अ‍ॅड. मीनल भोसले यांसह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)