शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

२८४ दिवसांच्या प्रवासानंतर ‘स्माइल टॉर्च’ नाशकात

By admin | Updated: October 6, 2015 23:49 IST

सात दिवस मुक्काम : आॅर्थोडॉन्टिक उपचारांच्या जनजागृतीसाठी उपक्रम

 नाशिक : इंडियन आॅर्थोडॉन्टिक सोसायटीने पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल या संस्थेच्या वतीने आॅर्थोडोन्टिक उपचारांविषयी जनजागृती वाढवण्यासाठी देशभरात ‘स्माइल टॉर्च’ (मशाल) फिरवण्याचा आगळा उपक्रम राबवला जात आहे. ही ‘स्माइल टॉर्च’ २८४ दिवसांचा प्रवास करून सोमवारी आॅर्थोडॉन्टिस्ट दिनानिमित्त नाशिकमध्ये दाखल झाली. पुढील सात दिवस या ‘स्माइल टॉर्च’चा शहरात मुक्काम राहणार असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक आॅर्थोडॉन्टिक स्टडी ग्रुपच्या वतीने आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुंबई येथून गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी ही ‘स्माइल टॉर्च’ प्रवासाला निघाली. पुणे, औरंगाबाद, नागपूर, रायपूर, दिल्ली, कोलकाता अशा देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांना भेटी देऊन ही मशाल सोमवारी नाशिकला दाखल झाली. या मशालीचे आगमन झाल्यानंतर त्या शहरात आॅर्थोडॉन्टिक उपचारांवर जनजागृती केली जाते. नाशिकमधील सात दिवसांच्या मुक्कामानंतर ही मशाल हिमाचल प्रदेशातील शिमला येथे रवाना केली जाणार आहे. येत्या १४ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या पन्नासाव्या राष्ट्रीय आॅर्थोडॉन्टिक परिषदेत ‘स्माइल टॉर्च’च्या प्रवासाची सांगता होईल. दरम्यान, स्माइल टॉर्चच्या आगमनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.