शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीसाठी प्रशासनाचे चाचपडणे सुरूच

By admin | Updated: April 15, 2015 22:15 IST

सीसीटीव्हीसाठी प्रशासनाचे चाचपडणे सुरूच

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीकाळात देशभरातून येणाऱ्या भविकांची सुरक्षा व एकंदरीतच संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत़ याबाबत गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी की भाडेतत्त्वावर या दोन विषयांवर पोलीस प्रशासन आणि सरकार यामध्ये खलबते आणि प्रस्तावाची देवाण-घेवाण सुरू होती़ दरम्यान, निविदाप्रक्रियेचे सोपस्कार आता पूर्ण झाले असून, अवघ्या तीन महिन्यांवर सिंहस्थ येऊन ठेपला असतानाही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही़ त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणेसंदर्भात पोलीस अजूनही चाचपड असल्याचे चित्र आहे़नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण १४ जुलै २०१५ रोजी होणार असून, त्यासाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ भाविकांच्या सुरक्षितता व पोलीस यंत्रणेला गर्दीचे नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीची इत्यंभूत माहिती मिळावी यासाठी शहरात सुमारे ३५० सीसीटीव्ही, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे १८० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत़ शहर पोलीस आयुक्तालयाने शहरात तर ग्रामीण पोलिसांनी त्र्यंबकेश्वरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्या ठिकाणी बसवावे याचे सर्व्हेक्षण, तसेच जागाही निश्चित केल्या आहेत़ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने बसविण्यात येणाऱ्या कायमस्वरूपी सीसीटीव्हीमुळे शहरातील गुन्हेगारीला पायबंद बसेल, असा हेतू यामागे होता़ मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्हीबाबत सांगूनही भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीचा घाट पोलीस प्रशासनातर्फे घालण्यात आला़ साहजिकच या दोन वादांमध्ये सीसीटीव्हीच्या प्रक्रियेमध्ये विलंब होत गेला़ अखेर शासनाने सिंहस्थासाठीचा कमी कालावधी लक्षात घेऊन भाडेतत्त्वावरील सीसीटीव्हीला मान्यता दिली़ त्यानुसार शहर पोलिसांना दोन वेळा निविदा काढण्याची वेळ आली़ त्यानंतर शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम विप्रो कंपनीला देण्यात आले़नाशिक शहरात तपोवनातील साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग, गोदावरी नदीपात्र व गर्दीच्या ठिकाणी, तर त्र्यंबकेश्वरमध्ये साधुग्राम, शाही मिरवणूक मार्ग, त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थकुंड व गर्दीच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शहरातील सीसीटीव्हीचे कंट्रोल रूम पोलीस आयुक्तालयात, तर त्र्यंबकेश्वरचे कंट्रोल रूम त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, रक्षकनगर सीतादेवी येथे तयार करण्यात येत आहे़ शहरातील सीसीटीव्हीचे टेंडर देऊन बारा दिवस उलटले असून, अजूनही या कामास सुरुवात करण्यात आलेली नाही़ त्र्यंबकेश्वरचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे हे काम वेळेत होईल का? याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे़(प्रतिनिधी)