शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना ध्वनिक्षेपक लावल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:42 IST

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.

नाशिक : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी अथवा समर्थकांनी विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.या संदर्भात आदेश जारी करण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की, निवडणुकीच्या रिंगणात असलेले राजकीय पक्ष, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊन सर्वसामान्य लोकांच्या शांततेस व स्वास्थ्याला बाधा पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचे कालावधीत ध्वनिक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्याची आवश्यकता असून, त्यासाठी निवडणूक प्रचारासाठी नाशिक जिल्ह्णात ध्वनिक्षेपकाचा वापर संबंधित पोलीस विभागाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत कोणत्याही क्षेत्रात फिरत्या वाहनावर ध्वनिक्षेपणाचा वापर करता येणार नाही.सर्व राजकीय पक्ष, उमदेवार व इतर व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा व त्यासंबंधी अशा ध्वनिक्षेपकाचे वापरासंबंधी घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहणार आहे.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात असून, सदर आदेशााची अंमल बजावणी मंगळवार, दि. १९ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय