शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई : शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषद यांची संयुक्त मोहीम

By admin | Updated: January 11, 2015 23:03 IST

येवल्यात मांजाविक्रेत्यांवर छापे

येवला : शहरात नायलॉन मांजा साठवणूक व विक्र ीस बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शहरात कापडबाजार, थिएटर रोड, देवी खुंट, नागड दरवाजा, बुन्देलपुरा भागात सर्व पतंग व मांजा विक्रेत्यांच्या दुकानांवर अचानक छापे टाकले.दुकानांची कसून तपासणी करण्यात आली. नायलॉन धागा कोठेही आढळला नसला, तरी धाब्यावर पतंग उडविणाऱ्या मुलांच्या हातात मात्र नायलॉन धागा दिसत आहे. धाब्यावर जाऊन पथक कारवाई करणार काय, हा खरा प्रश्न आहे. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर व पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवसांत शहरात पतंगोत्सव साजरा केला जातो. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. नायलॉन दोरा हा मजबूत असल्यामुळे होणाऱ्या शारीरिक इजा गंभीर स्वरूपाच्या असतात, जसे गळा कापणे, हात कापणे, पक्ष्याचा बळी जाणे वगैरे. परिणामी धाग्याचे दुष्परिणाम लक्षात घेता दुकानात नायलॉन दोरा विकण्यास ठेवू नये अगर विक्री करू नये याबाबत सर्व विक्रेत्यांना पथकातर्फे सूचना देण्यात आल्या. जर कोणी आढळून आले तर त्वरित येवला नगरपरिषदेस वा शहर पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी आर. आय. शेख व पोलीस उपनिरीक्षक एस. आर. बैरागी यांनी केले. नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मोहिमेत स्वच्छता विभागाकडील कनिष्ठ अभियंता सत्यवान गायकवाड, स्वच्छता निरीक्षक सुनील संसारे, कैलास बाकळे, नंदू घोगे, अर्जुन माळी तसेच पोलीस स्टेशनचे सी. एम. बागुल, एम. एच शेख व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)