शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

करबुडव्यांविरुद्ध कारवाई

By admin | Updated: March 28, 2017 02:03 IST

मालेगाव : महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या २० हजार लहान-मोठ्या करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध मनपा प्रशासनाने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे,

अतुल शेवाळे : मालेगावमहानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या २० हजार लहान-मोठ्या करबुडव्या मालमत्ताधारकांविरुद्ध मनपा प्रशासनाने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, तर २३ थकबाकीदार नळधारकांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात अडकल्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे काम मंदावले आहे. मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील कलेक्टरपट्टा, द्याने, सोयगाव, म्हाळदे, भायगाव, सायने गावांमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाच्या संकीर्ण कर विभागाने कंबर कसली आहे. मालेगाव महापालिकेला शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त मालमत्ता करातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते. नागरी सुविधा पुरविण्यासाठी व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मालमत्ता कर वसुलीतून येणारा पैसा खर्च केला जातो. मालेगाव शहरात हद्दवाढीसह एक लाख दहा हजार मालमत्ताधारक आहेत. यात ८० हजार घरगुती मालमत्ताधारक तर उर्वरित ३० हजारमध्ये वाणिज्य व औद्योगिक मालमत्ताधारकांचा समावेश आहे. मनपाच्या संकीर्ण कर विभागाने  १ एप्रिल २०१६ ते २४ मार्च २०१७ पर्यंत घरपट्टीपोटी दहा कोटी ४३ लाख ६८ हजार ९०१ रुपये, तर पाणीपट्टीपोटी सात कोटी ७२ लाख ७८ हजार रुपये असे एकूण १८ कोटी १६ लाख ४७ हजार ७६६ रुपये वसूल झाले आहेत. मनपा प्रशासनाने ४८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात पाणीपट्टीचे २६ कोटी, तर घरपट्टीचे २२ कोटी रुपये ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षभरात मालमत्ता कर वसुलीची कारवाई सातत्य नसल्यामुळे वसुली कमी झाली. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या संकीर्ण कर विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली आहे. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या व इतर कामे मनपात सुरू आहेत. यामुळे वसुलीचे काम रखडले आहे. तरीदेखील शहरातील २० हजार लहान-मोठ्या मालमत्ताधारकांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकीदारांमध्ये झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.पाणीपट्टी वसूल होत नसल्यामुळे मनपाने २३ नळधारकांचे नळजोडण्या खंडित केल्या आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभागनिहाय पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. एका प्रभागात दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. एका पथकात एक जप्ती अधिकारी, दोन वॉर्ड  लिपिक, तीन शिपाई अशा सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.