शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, भाजपला मोकळे सोडून सेनेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू असून, त्यात महाविकास आघाडी सरकारने केलेले काम व जनहिताच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य ...

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू असून, त्यात महाविकास आघाडी सरकारने केलेले काम व जनहिताच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी या अभियानाच्या निमित्ताने केली जात आहे. नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यात सध्या हे अभियान सुरू असताना आडगाव परिसरातील एका लॉन्समध्ये शिवसैनिकांनी मेळाव्याचे आयोजन केले असता, आडगाव पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून आयोजक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात अशाच प्रकारचे मेळावे होत असताना त्यांच्यावर पोलीस कारवाई झालेली नसताना शहरातच पोलिसांनी फक्त शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाशिक दौऱ्यात मंदिरात पूजा करताना राष्ट्रवादीने गर्दी केली तर भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाचा मेळावा पक्ष कार्यालयात घेण्यात आलेला असताना या दोन्ही गोष्टींकडे पोलिसांनी कानाडोळा केला. दोन्ही ठिकाणी गर्दी झालेली असताना फक्त राष्ट्रवादीच्या पाच पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली व मंत्र्यांना मात्र नामानिराळे सोडले तर भाजपाच्या मेळाव्यावर कोणतीही कारवाई केली नाही. सिडको व इंदिरानगरच्या शिवसेनेच्या शिवसंपर्क मेळाव्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेवर एकतर्फी कारवाई होत असल्याबद्दल लवकरच नेतृत्वाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.