शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

कृती समितीचे ठाकरे यांना साकडे

By admin | Updated: June 12, 2014 01:22 IST

कृती समितीचे ठाकरे यांना साकडे

 

नाशिक : ‘यूपीएससी’ने नागरी सेवांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादेत वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’नेही वयोमर्यादा वाढवून द्यावी, यासाठी विद्यार्थी कृती समितीने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे. दरम्यान, सदरप्रश्नी कृती समितीने याआधी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, महसूलमंत्री, मुख्यमंत्र्यांपासून ते थेट कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील निवेदन दिले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वांकडूनच निकालानंतर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कृती समितीला देण्यात आले होते. लोकसभा निवडणूक झाली, निकाल लागला; मात्र या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही. आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कृती समितीने याप्रश्नी ठाकरे यांना लक्ष घालण्याची गळ घातली आहे. ठाकरे यांनीही यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कृती समितीला दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यंदा सर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने याच बदलाची री ओढत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) विहित वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी ‘एमपीएससी’चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून पुढे आली. यासाठी नाशिक शहरात प्रथम विद्यार्थी कृती समिती स्थापन करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी समितीशी संपर्क साधत सदर मागणीेला पाठिंबा दर्शविला. यानंतर कृती समितीने स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देत सदर प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे कृती समिती आजवर गप्प होती; मात्र निवडणूक निकालानंतरही यावर कोणीच काहीही बोलायला तयार नसल्यामुळे समितीने नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेत याप्रश्नी लक्ष घालण्याची गळ घातली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष एस. जी. गायकवाड, प्रमोद मटाले, सागर हांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)