शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: February 16, 2017 01:00 IST

मिनी मंत्रालय निवडणुकीत रंगणार राजकीय फड

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोघा खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना आता चार विद्यमान आमदारांची व सात माजी आमदारांची प्रत्यक्ष प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात एकाच कुटुंबात दोन उमेदवारी मिळाल्याने तर आमदार निर्मला गावित यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना रमेश गावित या वाडीवऱ्हे येथून तर पुत्र हर्षल रमेश गावित हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा या गटातून उमेदवारी करीत आहेत. सुरगाणा विधानसभेचे आमदार जिवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित तर भदर गणातून तसेच पेठ तालुक्यातील धोंडमाळ गटातून माकपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांचे चुलत बंधू जि. प. सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर लोहणेर गटातून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. निफाडचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतिन कदम ओझर गटातून नागरी विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. या चौघा आमदारांची या निमित्ताने थेट प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले स्वत: दिंडोरी तालुक्यतील खेडगाव गटातून निवडणूक लढवित आहेत. तसेच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल, माजी आमदार लहानू अहिरे यांचे चिरंजीव गणेश अहिरे हे पठावे दिगर गटातून आदिवासी क्रांती संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे या देवपूर गटातून, काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ या शिरसाटे गटातून तर माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर या पालखेड गटातून तसेच माजी मंत्री अर्जुन पवार यांचे चिरंजीव नितीन पवार कनाशी गटातून तसेच दोन स्नुषा माजी अध्यक्ष जयश्री पवार व राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार या अनुक्रमे खर्डेदिगर व मानूर गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)