शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: May 14, 2016 22:55 IST

सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

न्यायडोंगरी : भारतीय सीमा सुरक्षा दलात छत्तीसगड येथे सेवेत असलेला न्यायडोंगरी येथील जवान किरण बाळासाहेब अहेर (२६) याचे अपघाती निधन झाले. या बातमीने गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे. दुचाकीवरून पडल्याने छातीस जबर मार लागल्याने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला.सुमारे तीन वर्षापूर्वी किरण अहेर सुरक्षा दलात भरती झाला होता. वर्षाभरापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. लग्नाच्या प्रथम वाढदिवस दोन दिवसांवर असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. किरणच्या निधनाची बातमी परिसरात कळताच नागरिकांनी घराकडे धाव घेतली. या वेळी परिसरातील भारतीय जवानांनी किरण यास मानवंदना देऊन अंत्यविधी करण्यात आला. या वेळी गावातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून व्यवहार बंद ठेवले होते. किरण यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रेल्वे कर्मचारी बाळासाहेब नारायण अहेर यांचा तो मुलगा होत. (वार्ताहर)