नाशिक : एकाच ठेकेदाराला घंटागाडीचा ठेका दहा वर्षांच्या कालावधीसाठी देण्याच्या आयुक्तांच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत सदस्यांनी कडाडून विरोध दर्शविला. तीन तासांच्या चर्चेनंतर अखेर महापौरांनी तीन वर्षांच्या कालावधीसाठी विभागनिहाय ठेका देण्यास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीपूर्वी जलदगतीने निविदाप्रक्रिया राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. दरम्यान, घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करणे अशक्य असल्याचे सांगतानाच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन मात्र आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी दिले.
एकाच ठेकेदाराला घंटागाडीचा ठेका
By admin | Updated: April 7, 2015 01:57 IST