शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांकडून स्वीकृत नगरसेवकपदाचे गाजर

By admin | Updated: May 12, 2017 23:44 IST

संगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले.

राजीव वडगे । लोकमत न्यूज नेटवर्कसंगमेश्वर : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिम भागात शिवसेना व भाजपात वाढलेल्या इच्छुकांच्या नाराजीला आवर घालण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांपासून अन्य अनेक पदांचे आमिष देण्यात आले. तथापि, नाराजी कमी झाली नाही. उलट महापालिका निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस असली तरी पश्चिम भागात भाजपा आणि शिवसेना, तर पूर्व भागात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. शेकडो अर्ज दाखल झाले होते. त्यानुसार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तथापि, सर्वच पक्षांकडे इच्छुकांची दावेदारी इतकी प्रबळ होेती की, प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्या, समाजाच्या माध्यमातून दबाव आणत होता.  अखेरीस अशा नाराजांना स्वीकृतचा शब्द देण्यात आला आहे. नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणे कठीण असले तरी केवळ नेत्यांचा शब्द म्हणून अनेकांनी दावेदारी मागे घेतली आणि पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याची तयारी दर्शविली. अशा प्रकारे वेगवेगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाचा शब्द दिला आहे.  महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकाच्या केवळ चार जागा आहेत. कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात, त्यांच्या संख्येच्या तुलनेत तौलनिक  संख्याबळ ठरते आणि त्यानुसार त्या पक्षाच्या वाटेला किती स्वीकृत सदस्यपदासाठी जागा येतात हे अजुन स्पष्ट नसताना शेकडो इच्छुकांना शब्द देण्यात आले असून, हुरळून गेलेले इच्छुक आता महानगरपालिका निवडणूक पार पडण्याची वाट पाहत आहेत.  मावळत्या महापालिकेत सखाराम घोडके, संजय दुसाने (शिवसेना), अ‍ॅड. हिदायतुल्ला अन्सारी (कॉँग्रेस), रहेमान शहा (कॉँग्रेस) हे स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत होते.