शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा दुरुपयोग

By admin | Updated: August 14, 2015 00:18 IST

अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा दुरुपयोग

नाशिक : ३५ लाखांची लाच मागितल्याने पोलीस कोठडीची हवा खावी लागलेल्या मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटताच या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणाऱ्या जमीनमालकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी तत्परतेने पावले उचलत नांदगाव तहसीलदारांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली असून, सोमवारी काही काळापुरते कार्यालयात हजर होऊन तसे पत्रही त्यांनी दिल्याचे वृत्त आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूडबुद्धीने तक्रारदार हवालदिल झाले असून, हा सारा प्रकार म्हणजे साक्षीदारांवर दबाव टाकणारा असल्याचे मानले जात आहे. नांदगाव तालुक्यात नवीन शर्तींच्या जमिनींच्या व्यवहारांना विभागीय आयुक्तांची अनुमती डावलून परवानगी दिल्याचे प्रकरण गेल्या दोन महिन्यांपासून गाजत असून, तत्कालीन तहसीलदारांची या प्रकरणी भूमिका वादग्रस्त ठरलेली असतानाच, त्याची चौकशी करणाऱ्या मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांनी थेट नवीन शर्तींच्या जमिनींचे व्यवहार करणाऱ्या काही विशिष्ट जमीनमालकांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत ३५ लाखांची लाच मागितल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात घडले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रामचंद्र पवार व त्यांचा सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली व दोन दिवस पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली होती. या काळात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पवार यांच्या बेनामी मालमत्तेचाही शोध घेण्यासाठी छापे मारले होते. तथापि, रविवारी जामिनावर सुटल्यानंतर पवार यांनी सोमवारी थेट मालेगावचे अपर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून १० आॅगस्ट रोजी नांदगाव तहसीलदारांच्या नावे पत्र पाठवून नांदगाव तालुक्यातील कासारी, गणेशनगर व गंगाधरी या तीन गावांतील बारा जमीनमालकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रासोबत पवार यांनी फिर्यादीचा नमुना, जमिनींचे सातबारे व व्यवहारांची माहितीही सोबत जोडल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे नांदगाव तहसीलदारांच्या नावे अशा प्रकारचे पत्र पाठवून पवार हे पुन्हा कार्यालयाकडे फिरकलेले नाही, नांदगाव तहसीलदारांनी आदेशाचे पालन केले नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिल्याचे समजते. पवार हे जामिनावर सुटल्यानंतर सोमवारी काही काळासाठी मालेगावच्या कार्यालयात गेले त्यानंतर मात्र त्यांच्या कार्यालयातील हजेरी-गैर हजेरीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयालाही नसल्याने त्याची उपरोक्त कृती संशयास्पद ठरण्याबरोबरच अधिकाराचा गैरउपयोगही ठरला आहे. (वार्ताहर)