शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नवाढीसाठी गोपनीय सर्वेक्षणांचा उतारा

By admin | Updated: July 7, 2016 00:02 IST

आयुक्तांचा दणका : मिळकतींतून १०० कोटी अपेक्षित

नाशिक : एकीकडे विकासकामांचा वाढता बोजा आणि दुसरीकडे उत्पन्नासाठी करवाढ करण्यास लोकप्रतिनिधींकडून होणारा विरोध, अशा कात्रीत सापडलेल्या महापालिका प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी गोपनीय सर्वेक्षणांचा उतारा शोधला असून, महापालिकेच्या एकूणच मिळकतींच्या माध्यमातून सुमारे १०० कोटी रुपये महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात सहभागी होण्यासाठी महापालिकेने पहिल्यांदा प्रस्ताव तयार केला त्यावेळी उत्पन्नवाढीसाठी नवनवीन स्त्रोतांची चर्चा करण्यात आली होती. त्याचवेळी आयुक्तांनी घरपट्टी व पाणीपट्टीत करवाढीचाही प्रस्ताव ठेवला होता. परंतु महासभेने सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. तसेच आयुक्तांनी दोन्ही वर्षे सादर केलेल्या अंदाजपत्रकातही करवाढीचा प्रस्ताव ठेवला, परंतु त्यालाही महासभेने केराची टोपली दाखविली. उत्पन्नाची जमा बाजू आणि खर्च यांचा ताळमेळ पाहून नगरसेवकांनी विकासकामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम वारंवार करत आले आहेत. परंतु लोकप्रतिनिधींकडून नगरसेवक निधीत वाढ करण्याचा आग्रह धरताना घरपट्टी-पाणीपट्टीसह व्यापारी गाळे आणि मनपाच्या मालकीच्या मिळकती यांची भाडेवाढ करण्यास हरकत घेतली जात आहे. याशिवाय, उत्पन्नाच्या स्त्रोतांमधील गळती शोधण्याचेही आव्हान लोकप्रतिनिधींकडून दिले गेल्याने आयुक्तांनी उत्पन्नवाढीसाठी गोपनीय सर्वेक्षणांचा उतारा शोधला असून, गेल्या महिनाभरात व्यापारी गाळ्यांबरोबरच सामाजिक सभागृहे, अभ्यासिका, व्यायामशाळा, वाचनालये, सभामंडप आणि खुल्या मैदानांबाबत विशेष मोहीम राबवून महत्त्वपूर्ण दस्तावेज संकलित केला आहे. व्यापारी गाळ्यांच्या सर्वेक्षणातही मोठ्या प्रमाणावर पोटभाडेकरू निदर्शनास आले, शिवाय करारनाम्याचा कालावधी संपूनही त्यांचा लिलाव झाले नसल्याचेही निष्पन्न झाले. गेल्या मंगळवारी मनपाच्या मिळकतींसंबंधी केलेल्या सर्वेक्षणातूनही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, मनपाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेला सद्यस्थितीत सुमारे १९०० व्यापारी गाळ्यांच्या माध्यमातून दोन ते अडीच कोटी रुपये उत्पन्न मिळते. रेडीरेकनर दरानुसार त्याची आकारणी केल्यास १९ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते.