शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

होमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण जेलरोड येथील शाळेतील प्रकार : मुख्याध्यापिकेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; ढोल वाजविण्याच्या काठीने विद्यार्थ्यांना मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:30 IST

नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमधील लहान पंधरा विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण केला नाही, कारणांवरून मुख्याध्यापक जयश्री रोडे यांनी मारहाण केल्याने वळ उठले आहे.

ठळक मुद्देपोलीस ठाण्यात गुन्हा दाखलविद्यार्थी रडत-रडत वर्गात गेले

नाशिकरोड : जेलरोड येथील इमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलमधील लहान पंधरा विद्यार्थ्यांना अभ्यास पूर्ण केला नाही, हस्ताक्षर चांगले नाही आदी कारणांवरून मुख्याध्यापक जयश्री रोडे यांनी मंगळवारी शाळेत काठीने जबर मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या हातापायावर वळ उठले आहे. दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड सैलानी बाबा दर्ग्याजवळील वृंदावन कॉलनीमध्ये ज्युनिअर केजी ते सातवीपर्यंत एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल आहे. शाळा सकाळी ८ ते दुपारी दोनपर्यंत असते. विद्यार्थ्यांसाठी शाळेची बस व व्हॅन आहे. तर काही पालक स्वत: विद्यार्थ्यांना सोडतात व आणायला येतात. मंगळवारी सकाळी १० वाजता प्राचार्या जयश्री रोडे यांनी वेगवेगळ्या वर्गातील १५ विद्यार्थ्यांना आपल्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्या वह्या व अभ्यास तपासला. अभ्यास अपूर्ण आहे, हस्ताक्षर चांगले नाही आदी कारणांवरून प्राचार्या रोडे यांनी एक-एक करत विद्यार्थ्यांच्या हातावर व पायाच्या पोटरीवर ढोल वाजविण्याच्या काठीने जबर मारहाण केली. काठीचे वळ उमटल्याने विद्यार्थी रडत-रडत आपापल्या वर्गात गेले. मार खाल्लेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना वर्गात जाऊन सदर प्रकार सांगितला. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या हातापायावर वळ उठले आहे, तेथे औषध लावण्यात आले. दुपारी शाळा सुटल्यानंतरही गंभीर मार लागल्याने विद्यार्थी रडत होते. त्यामुळे शाळेच्या वाहनचालकांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी विचारले तर काय उत्तर द्यायचे असे सांगत विद्यार्थ्यांना वाहनामधून सोडण्यास नकार दिला. मात्र काही वेळाने वाहनचालक विद्यार्थ्यांना सोडण्यास घेऊन गेले.दरम्यान, जेलरोड दसक येथील पालक कल्पना मंगेश बोंडे या आपल्या तिसरीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी ग्रंथालीला शाळेत घेण्यास गेल्यावर मुलगी ग्रंथालीने रोडे यांनी केलेली मारहाण व उमटलेले वळ रडत रडत दाखविले. यावेळी कल्पना बोंडे यांनी याबाबत शाळेत विचारणा करून नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना सदर प्रकार समजताच पोलिसांनी शाळेत धाव घेऊन प्राचार्या जयश्री रोडे यांना ताब्यात घेतले. दरम्यान जेलरोड मॉडेल कॉलनी येथे राहणारा ५ वीतील विद्यार्थी ओम भारत भोईटे याने घरी जाऊन पालकांना सदर प्रकार सांगताच त्यांनीदेखील पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रंथाली व ओम या दोन्ही विद्यार्थ्यांवर बिटको रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिला पालक कल्पना मंगेश बोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रंथाली व ओम यांनी प्रथमेश जगताप, प्रिन्स राजपूत, अद्वय जांबरे आदी विद्यार्थ्यांनादेखील मारहाण झाल्याचे सांगितले.