शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

गवंडगाव ग्रामपंचायतीसाठी ८७ टक्के मतदान

By admin | Updated: December 19, 2015 23:25 IST

गवंडगाव ग्रामपंचायतीसाठी ८७ टक्के मतदान

अंदरसूल : येवला तालुक्यातील गवंडगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली. यात सत्ताधारी पॅनलच्या विरोधात जनशक्ती विकास पॅनलने आपले उमेदवार उभे केले होते. मागील पंचवार्षिक निवडणुकीत या ग्रामपंचायतीसाठी एकूण तीन वॉर्ड होते. यंदा चौथ्या वॉर्डची निर्मिती झाल्याने सदस्य संख्या नऊवरून अकरा झाली, त्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली होती. एकूण २०४७ मतदारपैकी १७६६ व्यक्तींनी मतदानाचा हक्क बजावला सायंकाळपर्यंत एकूण ८७ टक्के मतदान झाले.सत्ताधारी पॅनलच्या विद्यमान सरपंच योगिता दिलीप भागवत यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास प्रगती पॅनलचे नेते दिलीप भागवत, संजय भागवत, अप्पासाहेब भागवत, भाऊसाहेब भागवत, रामदास भागवत यांनी सर्वानुमते व्यक्त केला. यात दलित वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, नवीन अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी कंपाउंड तसेच दोन पाझर तलाव आदि कामे पार पाडली. विरोधी पॅनल जनशक्तीचे रावसाहेब भागवत, डॉ. सुदाम भागवत, सोमनाथ भागवत, यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी कंबर कसली होती परंतु गवंडगाववासीय कोणाच्या बाजूने कौल देतात हे सोमवारी (दि. २१) स्पष्ट होईल. या निवडणुकीत प्रगती पॅनलकडून दशरथ गायकवाड, सुदाम मोरे, अलका गायकवाड, नितीन भागवत, सुवर्णा सोमासे, अरुणा गायकवाड, संजय भागवत, सुंदरा भागवत, रुपचंद भागवत, छाया वडाळकर, सुशीला भागवत, तर जनशक्ती पॅनलकडून विशाल गायकवाड, किरण गोरे, सुप्रभा गायकवाड, यननाथ भागवत, कांचन भागवत, मनीषा भागवत, संतोष भागवत, बाळू भागवत, भारती भागवत, गीताबाई भागवत, जयश्री भागवत रिंगणात आहेत.